गुजरात निकालांचा 'महाराष्ट्र इफेक्ट'; मराठा आरक्षणाच्या मागणीला पुन्हा जोर

गुजरात निकालांचा 'महाराष्ट्र इफेक्ट'; मराठा आरक्षणाच्या मागणीला पुन्हा जोर

'गुजरातमध्ये भाजपचे हुकलेले शतक हा इशारा समजा. महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दूर्लक्ष कराल तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही करणे अवघड जाईल. तोच मराठ्यांचा करारा जवाब समजा

  • Share this:

मुंबई,20 डिसेंबर: गुजरात निवडणुकांच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले आहेत. आज मुंबईभर भाजपला इशारा देणारे, मराठा युवा मोर्चाचे बॅनर लागले आहेत.

गुजरातमध्ये शंभर जागांचा आकडाही भाजपला पार करता आला नाही. याला एक फार महत्त्वाचं कारण होतं तिथला पटेल समाज. पटेल समाजाचं गेल्या काही वर्षांपासून आरक्षणासाठी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. गुजराथमधील भाजप सरकारने या मागणीकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे मोठ्या समाजात पटेलांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं. त्याचा फटका निवडणुकीत भाजपला बसला आहे.

आता याच धरतीवर महाराष्ट्रातील मराठा समाजाने आरक्षणाच्या मागण्यांना पुन्हा जोर धरला आहे. मुंबईत ठिकठिकाणी सरकारला इशारा देणारे बॅनर लावले आहेत.

या बॅनरवर 'गुजरातमध्ये भाजपचे हुकलेले शतक हा इशारा समजा. महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दूर्लक्ष कराल तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही करणे अवघड जाईल. तोच मराठ्यांचा करारा जवाब समजा.' असा इशारा दिला गेला आहे. राज्यात लोकसंख्येपैकी 32% जनता ही मराठ्यांची असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांवर हा समाज निश्चितच परिणाम करू शकतो.मराठा समाजात भाजप विरोधातील भावना तीव्र होत चालल्याचंही बोललं जातंय.

 

त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा रखडलेला प्रश्न रखडतो की सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: December 20, 2017, 8:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading