मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या विनोद पाटलांना 'या' पक्षाकडून मिळणार आमदारकी?

मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या विनोद पाटलांना 'या' पक्षाकडून मिळणार आमदारकी?

लवकरच विनोद पाटील हेदेखील राजकारणाचा मैदानात दिसू शकतात.

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : मराठा क्रांती मोर्चा आणि त्यानंतर मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई यामुळे विनोद पाटील हे नाव चर्चेत आलं. सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर विनोद पाटील यांनी न्यायालयात हे आरक्षण टिकावं यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर आता लवकरच विनोद पाटील हेदेखील राजकारणाचा मैदानात दिसू शकतात.

औरंगाबादमध्ये काही दिवसांनी विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेचं वर्चस्व असल्याने ही जागा शिवसेना जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून काही नावं चर्चेत आहेत. यामध्ये राज्यमंत्री आणि मराठवाड्यातील शिवसेनेचे वजनदार नेते अशी ओळख असलेले अर्जुन खोतकर, शहरप्रमुख राजू वैद्य, जिल्हाध्यक्ष नरेंद्र वैद्य यांच्यासह विनोद पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निकालानंतर विनोद पाटलांनी घेतली होती उद्धव ठाकरेंची भेट

कोर्टामध्ये मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निकाल आल्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यातील विविध पक्षातील नेत्यांची भेट घेत आभार मानले होते. यावेळी विनोद पाटलांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विनोद पाटलांसह सर्वांचं अभिनंदन केलं होतं.

दरम्यान, मराठा आऱक्षणाबाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टाने तुर्तास नकार दिला आहे. दोन आठवड्यादरम्यान याचिकाकर्ते पुन्हा याचिका करु शकतात, असंही कोर्टाने म्हटलं होतं.

VIDEO : आंध्रमध्ये नोकऱ्यात भूमिपुत्रांना आरक्षण? मनसेची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading