Home /News /maharashtra /

'शरद पवारांवर आमचं प्रेम, पण...'; विनायक मेटेंनी साधला निशाणा

'शरद पवारांवर आमचं प्रेम, पण...'; विनायक मेटेंनी साधला निशाणा

सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणावर स्थगिती आल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.

खेड, 22 नोव्हेंबर : मराठा आरक्षणावरून शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशोक चव्हाण आणि या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणावर स्थगिती आल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. 'मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. अशोक चव्हाण यांची समिती बरखास्त करण्यात यावी. त्याजागी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे या समितीचा कारभार सोपवावा,' अशी मागणी विनायक मेटे यांनी केली. शरद पवारांवर जोरदार टीका मराठा आरक्षणावरून विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. 'शरद पवार जाणता राजा आहेत, पण मराठा समाजातील मुलामुलींचे भविष्य त्यांना दिसत का नाही हा प्रश्न आहे. शरद पवार यांच्यावर आमचं प्रेम आहे, मात्र मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या हिताकडे ते का डोळेझाक करत आहेत हे समजत नाही,' असा घणाघात मेटे यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसानीचा मोबदला मिळत नाही. मराठा समाजाला न्याय मिळत नाही. हे पवार साहेब डोळे उघडे ठेऊन पाहत आहेत, मग सरकारला मार्गदर्शन कसल्या प्रकारचं करत आहेत? असा तिखट सवाल विचारत विनायक मेटे यांनी शरद पवार आणि ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Sharad pawar, Vinayak mete

पुढील बातम्या