मराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणाला तुर्तास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 02:16 PM IST

मराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणाला तुर्तास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली, 12 जुलै : मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टाने तुर्तास नकार दिला आहे. दोन आठवड्यादरम्यान याचिकाकर्ते पुन्हा याचिका करु शकतात, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाला विरोध करत काही जणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तुर्तास नकार दिला आहे. पण दोन आठवड्यानंतर स्थगिती देण्याबाबत पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाविरोधातील दोन याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. कुणबी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनांकडूनही दोन आव्हान याचिका सादर करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती मिळू नये, यासाठी माजी अ‍ॅटर्नी जनरल व ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकिलांची फौज बाजू मांडली.

काय आहे हायकोर्टाचा निकाल?

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावर हायकोर्टाने निकाल दिला. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण वैध ठरलं. पण, 16 टक्के आरक्षण देता येणार नाही. आरक्षणाची मर्यादा 12 ते 13 टक्के आणली पाहिजे, असं कोर्टानं सांगितलं आहे. हा निर्णय म्हणजे मराठा आंदोलनाचा विजय असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच दुसरीकडे 'राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकतं,' असा महत्त्वाचा निर्णय देखील मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसंच मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. हा निर्णय आल्यानंतर राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला होता.

Loading...

VIDEO : मराठा आरक्षणामुळे OBC आरक्षणाला धक्का बसणार, गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 11:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...