मराठा आरक्षणाविरोधात OBC नेते मैदानात, कोर्टात धाव घेणार

मराठा आरक्षणाविरोधात OBC नेते मैदानात, कोर्टात धाव घेणार

मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी समाजाचे नेते सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 7 जुलै : मराठा आरक्षणाविरोधात (maratha reservation ) ओबीसी समाजाचे नेते सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी आजा ओबीसी आणि व्हीजेएनटी संघटनांची बैठक होणार आहे. 40 हजार नोकऱ्यांचा अनुशेष भरा, मगच मेगाभरती करा, अशीही या संघटनांची मागणी आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्ते संजीत शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उच्च न्यायालयाने कायदेशीर तरतुदी लक्षात घेतल्या नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यानंतर आता ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

मराठा आरक्षणाबाबत काय आहे उच्च न्यायालयाचा निर्णय?

मराठा आरक्षण न्यायालयात टिकलं आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण वैध आहे. पण, 16 टक्के आरक्षण देता येणार नाही. आरक्षणाची मर्यादा 12 ते 13 टक्के आणली पाहिजे, असा कोर्टानं सांगितलं आहे. हा निर्णय म्हणजे मराठा आंदोलनाचा विजय असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच दुसरीकडे 'राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकतं,' असा महत्त्वाचा निर्णय देखील मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसंच मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. हा निर्णय आल्यानंतर राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला.

विनोद पाटलांकडून कॅव्हेट दाखल

मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने काही दिवसांपूर्वीच अ‍ॅड.संदीप देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आहे. त्यामुळे विनोद पाटील यांनी हे कॅव्हेट दाखल केलं आहे. यामुळे आता मराठा आरक्षणविरोधी याचिकेवर सुनावणी करताना आरक्षणाच्या बाजूचं म्हणणंही ऐकूण घ्यावं लागणार आहे.

SPECIAL REPORT : हे असलं धाडस करू नका! बाईकस्वाराचा जीवघेणा स्टंट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading