...म्हणून मराठा मोर्चाने सरकारच्या भूमिकेवर व्यक्त केला संशय

समाजात चुकीचा संदेश जात असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, मुंबई, 20 डिसेंबर : नवीन सरकार स्थापनेनंतर जुनी मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त झाली आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत. लवकरात लवकर नवीन सरकारच्या उपसमितीची स्थापना व्हावी यासाठी मराठा मोर्चा आग्रही आहे.

मराठा आरक्षणाबाबतच्या खटल्याचे दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात नोटींग होते. मात्र या नोटींगला वरिष्ठ विधीतज्ञ मुकूल रोहतगी हे अनुपस्थित राहिल्याने मराठा मोर्चाने सरकारच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला आहे. यापूर्वी राष्ट्रपती राजवटीच्या काळात लवकर वकील उपलब्ध करुन दिले नाही आणि उपलब्ध करुन दिलेले वकील न्यायालयीन प्रक्रियेसाठी उपस्थित राहात नाही, यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

सत्ता गेल्याने भाजप सैरभैर, रोहित पवारांनी पहिल्याच भाषणात उडवली खिल्ली

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यालायात मराठा आरक्षण संदर्भात भूमिका मांडणाऱ्या यापूर्वीच्या वकिलांना बदलण्यात आले आहे? जर हे खरे असेल, तर सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा देत असलेल्या मुकुल रोहतगी आणि नाडकर्णी यांसारख्या जेष्ठ वकिलांना बदलण्याचे कारण काय? असा सवाल संभाजीराजे यांनी केला होता. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्रही लिहिलं आहे. या पत्राद्वारे संभाजीराजेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्वरित दखल घेतली होती. 'मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेत, यावर माझ्याशी संपर्क केला. तसंच त्यांनी पूर्ण विश्वास दिला की मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही. त्यामुळे समाजाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो, आणि ते असेच सहकार्य करतील असा विश्वासही व्यक्त करतो,' असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 09:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading