मराठा समाजाला आरक्षण हा माझाही विजय -नारायण राणे

मराठा समाजाला आरक्षण हा माझाही विजय -नारायण राणे

मीही याआधी मराठा आरक्षणाचा अहवाल मांडला होता. तेव्हा अहवालात याच तरतुदी होत्या.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 29 नोव्हेंबर :  मराठा आरक्षणाचा निर्णय हा ऐतिहासिक आहे. मी सुद्धा मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची तरतूद केली होती. त्यामुळे हा माझाही विजय आहे असं माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

नारायण राणे यांनी सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.  आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाले.  याचं श्रेय मराठा समाज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले पाहिजे. मराठांच्या प्रगतीचा आता मार्ग मोकळा झाला आहे.  मराठा समाजाला आता नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार आहे असं यावेळी राणे म्हणाले.

मीही याआधी मराठा आरक्षणाचा अहवाल मांडला होता. तेव्हा अहवालात याच तरतुदी होत्या. त्याच तरतुदी मागसवर्गाच्या अहवालात मांडण्यात आल्या आहे. त्यामुळे हा विजय माझाही आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार हे विधेयक मंजूर झालं आहे. त्याचा मला आनंद आहे असं राणे म्हणाले.

राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल हा सर्व्हे करून तयार केला. उद्या जर कोर्टात कुणी उभं राहिलं तर हा सर्व्हे सांगण्यासाठी राहणार आहे असंही राणे म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजानं आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आलं आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मंजूर करण्यात आलं आहे. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळालं आहे.  राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा आरक्षण तात्काळ लागू होणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आधीच ठरल्याप्रमाणं या विधेयकावर कुठलीही चर्चा झाली नाही. ते आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. त्यानंतर मुख्यंत्र्यांनी विधान परिषदेतही विधेयक मांडलं. तिथंही ते आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं.

================================

First published: November 29, 2018, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading