मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सदावर्तेंना कोर्टाबाहेर मारहाण

मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सदावर्तेंना कोर्टाबाहेर मारहाण

राज्य सरकारनं विधेयक आणून शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलंय. याबाबत सुनावणी आज होणार आहे.

राज्य सरकारनं विधेयक आणून शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलंय. याबाबत सुनावणी आज होणार आहे.

राज्य सरकारनं विधेयक आणून शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलंय. याबाबत सुनावणी आज होणार आहे.

    मुंबई, १० डिसेंबर : मुंबई हायकोर्टात आज मराठा समाज आरक्षण प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणी झाल्यानंतर याचिकाकर्ते वकिल गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण कऱण्यात आली. एक मराठा लाख मराठा घोषणा देत एका तरुणाने सदावर्ते यांना मारहाण केली.

    सुनावणी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत एक तरुणाने सदावर्ते यांच्यावर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. वैद्यनाथ पाटील असं या तरुणाचं नाव आहे. तो जालना जिल्ह्यातला रहिवासी आहे. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली या रागातून या तरुणाने हल्ला केला. तिथे उपस्थितीत असलेल्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं.

    दरम्यान, तर सरकारनं आरक्षणासह जाहिराती देण्याची घाई केली, असं म्हणत या सुनावणीदरम्यान कोर्टानं सरकारला फटकारलं. राज्य सरकारनं विधेयक आणून शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलंय. याबाबत सुनावणी आज होणार आहे. राज्य सरकारनं या संदर्भात संमत केलेल्या कायद्याविरोधात जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेसोबतच २०१४ साली त्यावेळच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या  याचिकांवरदेखील आज एकत्रितपणे सुनावणी होणार आहे.

    कोर्टात काय होतं हे पाहून एमपीएससीनं जाहिरात द्यायला हवी होती, असं कोर्टानं सरकारला सुनावलं. या परीक्षेसाठी अनेक होतकरु व्यक्ती अर्ज करत असतात

    त्याच वेळी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, या दोन्हीचं आपण संतुलन ठेवलं पाहिजे, भान ठेवलं पाहिजे, असं सांगत कोर्टात सुनावणी सुरु असताना एमपीएससी जाहिराताची घाई का ? असा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला.

    दरम्यान, कोर्टाने सांगितल्यास आम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल जाहीर करण्याचा विचार करू पण तसं आम्ही आत्ताच अाश्वासन देऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलं आहे.

    गेल्या सुनावणी वेळी हायकोर्टानं आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण घटनात्मकदृष्ट्या योग्य नसून ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा कायद्याला विरोध करणा-यांचा आक्षेप आहे. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीदेखीस हस्तक्षेप याचिका दाखल केली.

    आठवलेंच्या विधानाचा निषेध

    दरम्यान, मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असं विधान केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर अनेक जणांनी निषेध नोंदवला आहे. न्यायालयात टिकणं अवघड असलं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची आग्रही भूमिका असल्याचंही रामदास आठवले म्हणाले होते.

    खोपोली येथे जिल्हा युवक मेळाव्यादरम्यान पत्रकार परिषदमध्ये बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलं आहे. तर मंदिरं, पुतळे बांधले नाहीत तर मतं मिळणार नाहीत असंही आठवले म्हणाले. त्याचबरोबर भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युती भाजपाला फायदेशीर असल्याचा उल्लेखही त्यांनी या परिषदेत केला.

    VIDEO आठवले यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला बेदम चोप

    First published:

    Tags: Maratha reservation, Ramdas Athawle