मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन, सरकारकडून प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांची स्थगिती

मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन, सरकारकडून प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांची स्थगिती

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मे : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न चिघळला आहे. याबाबत विद्यार्थ्यांचं आंदोलनही सुरू आहे. त्यानंतर आता सरकारने या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने वैद्यकीय प्रवेशाला सात दिवसांची स्थिगिती दिली आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. सरकारने आता वैद्यकीय प्रवेशासाठी अकरा दिवसाची मुदत वाढवण्यासाठी सरकारने परिपत्रक काढलं आहे. ऑनलाईन प्रवेशाच्या वेबसाईटवर सरकारकडून हे परिपत्रक टाकण्यात आलं आहे. त्यामुळे वैद्यकीय आणि दंत प्रवेश प्रक्रियेला 25 तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शैक्षणिक सवलतीबाबत विचार करण्यासाठी मुंबईतील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठकही पार पडली.

महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा आरक्षण लागू करण्यात आलं. मात्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येत नाही. कारण मराठा आरक्षण लागू होण्याआधी 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटिफिकेशन आल्याने त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. सुप्रीम कोर्टानेही नागपूर खंडपीठाचा हा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे हा प्रश्न नेमका कसा सोडवला जाणार, हे पाहावं लागेल.

VIDEO : 'जय श्रीराम' घोषणा देणं पडलं महागात, भाजप महिला नेत्याला बेदम चोपले

First published: May 14, 2019, 3:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading