विजय कमळे पाटील, प्रतिनिधी
जालना, 25 मे: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapti Sambhaji Raje) यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. आज जालन्यात (Jalana) छत्रपती संभाजीराजे यांनी काही कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर संभाजीराजे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षण प्रकरणी आता जबाबदारी केंद्राची की राज्याची यापेक्षा मराठा समाजाला न्याय कसा मिळेल हे जास्त महत्त्वाचे आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य आणि केंद्रात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या मुद्द्यावर आपली सावध प्रतिक्रिया दिली आहे.
मेटेंसोबतच्या तुलनेवर संभाजीराजे म्हणाले...
— News18Lokmat (@News18lokmat) May 25, 2021
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात सुरू असलेल्या दौऱ्यात खासदार संभाजीराजे यांनी आज जालन्यात काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत बैठक केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना विनायक मेटेंशी (Vinayak Mete) तुलना केल्याबद्दल पत्रकारांना संभाजीराजेंनी चांगलेच खडसावले. मेटेंची माझी तुलना का करताय. मेटे मेटे आहेत संभाजीराजे हे संभाजीराजे आहेत असं म्हणत मेटे त्यांच्यापरीने प्रयत्न करतायेत ते पण गुड अँड वेल आहे, या शब्दात त्यांनी मेटेची स्तुती देखील केली आहे.
'...तर मी उद्याच राजीनामा देतो'; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन छत्रपती संभाजीराजे उद्विग्न
मला कोणाच्या पाठिंब्याची काय गरज, मराठा समाजाचाच मला पाठिंबा आहे, मी समाजाचा एक घटक आहे. मी 2007 पासून कार्यरत आहे. मी दिसतोय जरी यंग पण वय आहे 50. मला राजकीय पदाची वगैरे हौस नाही. याबरोबरच मराठा आरक्षणाच्या मोरच्याला भाजपने दिलेल्या पाठिंब्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे कडाडले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati, Vinayak mete