मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maratha Reservation: बीडमधील मराठा क्रांती संघर्ष मोर्चा प्रकरणी विनायक मेटेंसह 3 हजार जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: बीडमधील मराठा क्रांती संघर्ष मोर्चा प्रकरणी विनायक मेटेंसह 3 हजार जणांवर गुन्हा दाखल


विशेष म्हणजे, या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती, तरीही मोर्चा काढण्यात आला होता.

विशेष म्हणजे, या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती, तरीही मोर्चा काढण्यात आला होता.

विशेष म्हणजे, या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती, तरीही मोर्चा काढण्यात आला होता.

बीड, 06 जून: मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्च्याकडून (Maratha Kranti Sangharsh Morcha) मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणी आयोजकांसह 3 हजार लोकांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. यात आमदार विनायक मेटे (Vinayak mete), नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जून रोजी  बीडमधील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल याठिकाणी मराठा समाजाने एकत्र येत मोर्चा काढला होता. हा मोर्चा शहरातील प्रमुख रत्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला होता.  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला यानंतर मान्यवरांची आक्रमक भाषणे झाली. निवडक समन्वयकांनी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्या जर मागण्या पाच जुलैपर्यंत मान्य झाला तर सात जूनला अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा देखील संयोजकांनी दिला. पुणेकरांची उकाड्यातून सुटका, पुण्यात मान्सून दाखल विशेष म्हणजे, या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती.  मोर्चाची परवानगी नाकारली तरी, कसल्याही परिस्थिती मोर्चा निघणारचं असं शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी जाहीर केलं होतं. महाराष्ट्रात शुटींगला परवानगी; नियमांत शिथिलता आणून चित्रिकरण होणार सुरू अखेर, विना परवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी प्रमुख 21 जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.यामध्ये विनायक मेटे यांचा सुद्धा सहभाग आहे. मोर्चात सहभागी झालेल्या इतर अज्ञात अडीच ते तीन हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच साथरोग नियंत्रण कायद्या नुसार सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. मराठा समाजाच्या मागण्या 1) 5 मे च्या निर्णयावर पूर्णविचर याचिका 2) आरक्षणाचा नवीन प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवावा 3) obc प्रमाणे सवलती घ्यावा 4) सारथी सारख्या संस्था ना मदत करावी 5) esbc / sebc नियुक्ती देण्यात याव्यात 6) सारथी संस्था ताकतीने सुरू करावी 7) आर्थिक विकास महामंडळ थेट कर्ज योजना सुरू करा 8) बलिदान गेलेल्या युवकांच्या कुटुंबाला नोकरी व इतर लाभ दयावे 9)  मराठा आंदोलकावरील सरसकट गुन्हे मागे घ्यावे 10) कोपर्डीच्या नाराधमांना फाशीची शिक्षा द्यावी 11) उद्योग करणाऱ्याना आर्थिक मदत करावी
Published by:sachin Salve
First published:

Tags: Maratha reservation

पुढील बातम्या