Home /News /maharashtra /

Maratha Reservation cancelled : संभाजीराजे झाले भावूक, समाजालाही केले शांत राहण्याचे आावाहन, VIDEO

Maratha Reservation cancelled : संभाजीराजे झाले भावूक, समाजालाही केले शांत राहण्याचे आावाहन, VIDEO

शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. पण, समाजासाठी हा निर्णय दुर्दैवी आहे'

कोल्हापूर, 05 मे : मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे आपण भावूक झालो आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी दिली.  कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे, त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी शांततेची भूमिक घ्यावी, असं आवाहनही त्यांन केलं. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 'मागील सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतला होता. याबद्दल कायदा सुद्धा पारीत झाला होता. पण त्यानंतर ठरावीक लोकांनी विरोध केला होता. आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.  सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असं स्पष्ट केले आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. पण, समाजासाठी हा निर्णय दुर्दैवी आहे' असं संभाजीराजे म्हणाले.

'केअर टेकर' बनून लाखोंचा माल लुटला, वृद्धांना लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पूर्वीच्या सरकारने आणि या सरकारने देखील आपली बाजू कोर्टात जोमाने मांडल्याची प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य करत संभाजीराजे यांनी असं आवाहन केलं आहे की, 'यानंतर उद्रेक होऊ नये या मताचा मी आहे. एकीकडे कोव्हिड महामारी सुरू आहे. माणसं मरत आहे, यावेळी आपली माणसं जगायला हवी याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. उद्रेक हा शब्दच कुणी काढू नये, अशी माझी मराठा समाजाला विनंती आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: संभाजीराजे

पुढील बातम्या