मराठा आरक्षण कायदा आजपासून राज्यभरात लागू

मराठा आरक्षण कायदा आजपासून राज्यभरात लागू

राज्यभरातील क्रांती मोर्च्यांद्वारे सरकारवर आणलेला दबाव आणि मागासवर्ग आयोगाचा अनुकूल अहवाल याद्वारे मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली. राज्य सरकारनेही अत्यंत शिताफीनं मोठी कसरत करत मराठ्यांना नुकतीच स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 डिसेंबर : मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी स्वाक्षऱ्या केल्यानंतर आज (शनिवार) राज्य सरकारकडून राजपत्र जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासूनच राज्यामध्ये मराठा आरक्षण कायदा लागू झाला आहे.

राज्यभरातील क्रांती मोर्च्यांद्वारे सरकारवर आणलेला दबाव आणि मागासवर्ग आयोगाचा अनुकूल अहवाल याद्वारे मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली. राज्य सरकारनेही अत्यंत शिताफीनं मोठी कसरत करत मराठ्यांना नुकतीच स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली आहे.

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यातल्या आरक्षणाची मर्यादा आता 68 टक्क्यांवर गेली आहे. तामिळनाडूनंतर एवढं आरक्षण देणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे. राज्यघटनेनुसार आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेता येत नाही. मात्र विशेष परिस्थितीत राज्य सरकार जास्त आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ शकतात.

तामिळनाडूच्या आरक्षणांचा प्रश्न हा अजुनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळं तिथे निर्धोकपणे 69 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. त्याच पॅटर्नचा आधार घेत आता महाराष्ट्र सरकारनेही निर्णय घेतल्याने हा निर्णय टिकवण्यासाठी राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे.

अशी आहे आरक्षणाची वर्गवारी

अनुसूचित जाती जमाती - 20 टक्के

ओबीसी - 19 टक्के

मराठा - 16 टक्के

भटके विमुक्त - 11 टक्के

विशेष मागासवर्ग - 02 टक्के

एकूण आरक्षण - 68 टक्के

मराठा आरक्षणासंदर्भातील एटीआर मुख्यमंत्र्यांनी नुकताच विधानसभेत मांडला होता. या एटीआरमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडण्यात आले आहेत ते पाहूयात...

- मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणार

- एकूण नियुक्तांच्या 16 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे

- एसईबीसीच्या आरक्षणसाठी उन्नत आणि प्रगत गटाचं प्रतिनिधित्त्व

- मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण

- उन्नत आणि प्रगत गटाला हे लागू होणार नाही

- एसईबीसी वर्गातलं आरक्षण गुणवत्तेनुसार

- ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही

ओवीसींचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 01:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading