मुंबई, 11 मे: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह राज्याच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणसंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आता केंद्र सरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर पाऊले उचलावीत अशी विनंती राष्ट्रपतींना करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण कायद्यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा 'फुलप्रूफ' नव्हता! किती हा दुटप्पीपणा?"
मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते.
... आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो.
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?
वाचा: Maratha Reservation: कायदा फुलप्रूफ होता तर टिकला का नाही? मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा स्थगिती देण्यास नकार मिळतो.... आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?"
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रूफ असता तर आता आम्हाला राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला.
मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. आरक्षण प्रश्नी सरकार सोबत आहे याची समाजाला कल्पना आहे, ते सरकारच्या विरोधात नाहीत. त्यामुळे मी पूर्वी देखील मराठा समाजाला धन्यवाद दिले आहेत आणि आता आपल्या माध्यमातून परत धन्यवाद देतो असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.