मराठा मोर्चेकऱ्यांच्या गाडीला अपघात, 5 आंदोलकांचा मृत्यू

मराठा मोर्चेकऱ्यांच्या गाडीला अपघात, 5 आंदोलकांचा मृत्यू

मराठा क्रांती मोर्चावरून घरी परत येत असताना झालेल्या तिहेरी भीषण अपघातात औरंगाबाद परिसरातील ४ जणांचा मृत्‍यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

औरंगाबाद, 10 ऑगस्ट : मराठा क्रांती मोर्चावरून घरी परत येत असताना झालेल्या तिहेरी भीषण अपघातात औरंगाबाद परिसरातील 5 जणांचा मृत्‍यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हर्षल अनिल घोलप (वय, २८, रा. गावठाण, रुकडी पुणे), नारायण कृष्‍णा थोरात (वय, २१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे आणि गौरव प्रजापती (वय, २३, रा. बजाज नगर, जि. औरंगाबाद) अशी ठार झालेल्‍या चौघांची नावे आहेत. तर, जखमींना उपचारासाठी वैजापूर येथील सामान्य रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

येवला तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद मार्गावर खामगाव पाटी शिवारात ट्रक (एम. एच. १८ एम ३११४), व्हर्ना कार ( एम. एच. २०, इ एफ. ७२६४) आणि मारुती कार ( एम. एच. १५, बी. डब्‍लू) यांचा सकाळी ६.३० च्या सुमारास हा तिहेरी अपघात झाला. यात हर्षल, नारायण आणि अविनाश यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर, उमेश भगत गंभील जखमी झाला आहे. अपघातात व्हर्ना कारचा चक्काचूर झाला असून, ट्रकचे पुढचे टायरही निखळून गेले आहे. व्हर्ना कारमधील तरूण मुंबई येथील मराठा मोर्चावरून औरंगाबादला परतत होते. या अपघाताबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.

First published: August 10, 2017, 6:59 PM IST

ताज्या बातम्या