मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून मोठी घोषणा, आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता

मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून मोठी घोषणा, आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 29 जून: सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मराठा समाजानं आता 'आत्मबलिदान' आंदोलनाची घोषणा केली आहे. 23 जुलैपासून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे.

हेही वाचा...पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार, प्रवीण दरेकरांचा दावा

काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिस्थळावरून आत्मबलिदान आंदोलनाला सुरूवात होणार आहे. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या 42 कुटुंबची आंदोलनात सहभागी होणार आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा रमेश केरे यांनी दिला आहे.

अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा...

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही झाली नाही. त्यामुळे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठी संघटनेचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी केली आहे. रमेश केरे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनही पाठवलं आहे. तसेच राज्य सरकारने कोर्टात आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी काय तयारी केली आहे, असा सवालही रमेश केरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलक उमेदवारांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात न्यायालयीन बाजू तपासून घेण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन दिले होते. आश्वासनामुळेच आझाद मैदानवरील आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आलं होतं. मात्र, आजपर्यंत यावर कोणतीही बैठक अथवा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं रमेश केरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात

आझाद मैदानावर 47 दिवस आंदोलन करणाऱ्या तरुणांना नियुक्तीपत्र द्यावे, अशी मागणीबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, असंही रमेश केरे यांनी म्हटलं आहे.

First published: June 29, 2020, 3:00 PM IST

ताज्या बातम्या