औरंगाबाद 01 सप्टेंबर : मराठा क्रांती मोर्चाची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर विनोद पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितलं की बैठकीतील मागण्या सरकारकडे मांडणार आहे. 15 दिवसात सरकारने आरक्षणाविषयी भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच असं न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे.
15 दिवसात सरकारने आरक्षणाबाबत भूमिका मांडली नाही, तर आगळ्या वेगळ्या आंदोलनाला सुरवात होईल, असा इशारा विनोद पाटील यांनी दिला. मागच्या आयोगाचा अनुभव पाहता आता आम्ही OBC आहोत मग OBC तून आरक्षण का नको, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला राजकीय आरक्षण नाहीच, पण आम्ही केवळ शैक्षणिक आणि रोजगारविषयी आरक्षणाची मागणी करतो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्रातून? चर्चेदरम्यान नाना पटोलेंचा मोठा खुलासा, थेट नावच सांगितलं
विनोद पाटील म्हणाले, की आमच्या आंदोलनाला आता चेहऱ्याची गरज नाही. आता मराठा समाज हाच आमचा चेहरा असणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीसाठी मराठवाड्यातील आम्ही सर्व एकत्र आलो. कोपर्डी अत्याचार प्रकरणी न्याय मिळाला नाही. स्वतः मराठा क्रांती मोर्चाने वकील देऊन खटला चालवला होता. आता आमचा छळ करू नका, असं म्हणत १५ दिवसाच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha kranti morcha