मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठा मोर्चाच्या तोडफोडीमुळे परतीच्या मार्गी निघालेला वारकरी खोळंबला

मराठा मोर्चाच्या तोडफोडीमुळे परतीच्या मार्गी निघालेला वारकरी खोळंबला

पंढरपूर, 24 जुलै : महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे काल रात्रीपासून पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गैरसोय झाली. पोलिसांनी सर्व एसटी काही काळ थांबवून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हजारो वारकरी एसटी स्थानकात खोळंबले होते. मराठा आंदोलकांनी गेल्या चार दिवसांमध्ये एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ केलीय. यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे पंढरपूरच्या वारीला येणाऱ्या बसेसचे नुकसान अधिक आहे. त्यात आज महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने पोलिसांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी बस वाहतूक काल रात्री काही काळ थांबबिण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वारी पोहचती करून परतीच्या प्रवासाला निघालेले हजारो वारकरी प्रवासी बस स्थानकावर खोळंबले आहेत. मराठा मोर्चाकडून 'ही' शहरं वगळता आज महाराष्ट्र बंदची हाक VIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही ! या मोर्चाचे परिणाम सोलापुरातही पहायला मिळाले.  सोलापूर शहरातही एसटीची तोडफोड करण्यात आलीय.  रुपाभवानी मंदिराजवळ ही घटना घडली. चारचाकी गाडीतून काही जणांनी एसटी रोखून धरली आणि ही तोडफोड केली. या सगळ्यामुळे मात्र रोज कामावर जाणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोल्हापूरमध्येही आज ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पण बंद बाबत आंदोलांकर्त्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही. पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर विशेषतः सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूरला जातात. आपल्याच वारकऱ्यांना बंदचा त्रास होऊ नये यासाठी आज महाराष्ट्र बंदच्या ऐवजी बुधवारी जिल्हा बंद पुकारण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर विशेषतः सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूरला जातात. आपल्याच वारकऱ्यांना बंदचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. हेही वाचा... शूटआऊट अॅट नालासोपारा, भरस्त्यावर गुंडाचा एन्काऊंटर बापरे!,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्... मुख्यमंत्री फडणवीसांनी 'या' गुन्ह्यातून बिल्डरांची केली सुटका
First published:

Tags: Bus burn, Maharashtra, Maratha kranti morcha, No bus in pandharpur, Pandharpur, St stand, Todfod, Warkari, पंढरपूर, मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र बंद, वारकरी

पुढील बातम्या