मराठा मोर्चात आणखी एका आंदोलकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

मराठा मोर्चात आणखी एका आंदोलकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

परभणी, 26 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासूम मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील लोकांचं आंदोलन धुमसत आहे. आजही जागोजागी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलनाचा बडगा उचलला आहे. पण यात नांदेडमध्ये पुन्हा एका मराठा आंदोलकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही पुर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथील घटना आहे. प्रशांत सवराते असं या तरुणाचं नाव आहे. मराठा समाजाच्या मागण्या व्हाव्या यासाठी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेनंतर प्रशांत यांना तात्काळ नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

'मराठी' तरूणांनो जीव गमावू नका, तुमची वाट पाहणारं घरी कुणीतरी आहे! - राज ठाकरे

आतापर्यंत झालेल्या 58 मराठी मोर्चांमधून हा तिसरा आत्महत्येचा प्रयत्न आहे. मराठा मोर्चाच्या या ठोक आंदोलनात आता राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी मान्य व्हावी यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी राजीनामा दिला आहे.

मुंबईमध्ये भरदिवसा शाळेसमोर 17 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

हे होऊनही हे आंदोलन कुठेही थांबताना दिसत नाही आहे, तर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड, दगडफेकीचं सत्र सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे आता या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा...

PHOTOS: मुंबईसारखीच दिल्लीही तुंबली

VIDEO : सांगलीनंतर सोलापूरमध्येही जाळली एसटी बस

असा होता कारगिल युद्धाचा घटनाक्रम, सर्वस्व पणाला लावून पाकचा केला होता पराभव

 

 

First published: July 26, 2018, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading