Maharashtra Bandh: औरंगाबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Maharashtra Bandh: औरंगाबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

संतप्त आंदोलकांकडून अग्निशमन दलाच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली

  • Share this:

औरंगाबाद, २४ जुलैः महाराष्ट्रात सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस हिंसक होत चाललं आहे. औरंगाबादमध्ये शाम पाटगावकर या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शाम हे कायगाव टोक येथे बंदोबस्ताला होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याच ठिकाणी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. जमावाकडून दगडफेक होत असताना धावपळीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादमध्ये आज एसटी वाहतूक सकाळपासून बंद आहे. तसेच आंदोलनामुळे आतापर्यंत सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद असून मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त आंदोलकांकडून अग्निशमन दलाच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली आहे.

दरम्यान मराठा आंदोलनात काही समाज कंटक घुसलेत त्यामुळे मराठा आंदोलन बदनाम करत असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय. आरक्षण देणं हे सरकारच्या हातात नाही. आरक्षणाचा निर्णय हा न्यायालयातच होणार आहे. आंदोलनं करून बसेस जाळून आरक्षण मिळणार नाही. त्यामुळं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन चंद्रकांत दादांनी केलंय. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीनही जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झालाय. कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर शहरातली अनेक दुकानं व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केली असून, एसटीची सेवा ही तुरळक प्रमाणामध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले आहेत. दरम्यान, सकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नांदेड येथेही मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण आले आहे. आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात ४ ते ५ आंदोलक जखमी झाले. यात महिलांचाही समावेश आहे. नांदेड येथील राज कॉर्नरवर तणाव वाढत चालला आहे.

हेही वाचाः

पुन्हा एका मराठा कार्यकर्त्याने नदीत टाकली उडी, गंभीर जखमी

मराठा कार्यकर्ते चिडले, काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्कारावेळी खैरेंना केली शिवीगाळ, धक्काबुक्की

VIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की

First published: July 24, 2018, 3:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading