FB पोस्ट टाकून तरूणाची रेल्वेखाली आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिल्याचा दावा

FB पोस्ट टाकून तरूणाची रेल्वेखाली आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिल्याचा दावा

पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रमोद होरे पाटील (28) असं या युवकाचं नाव आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 30 जुलै : औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर युवकाने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रमोद होरे पाटील (28) असं या युवकाचं नाव आहे. मराठा आरक्षणासाठी या प्रमोदने आत्महत्या केली असल्याचा आंदोलकर्त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिल्याचं आंदोलकर्त्यांचं म्हणणं आहे. रविवारी संध्याकाळी प्रमोदने आत्महत्या करण्याआधी फेसबुकवर 'मराठा आरक्षण जीव जाणार' अशा कॅप्शन सह त्याचा रेल्वे ट्रॅकवरील फोटो पोस्ट केला असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रमोदची ही पोस्ट वाचल्यानंतर त्याच्या मित्रमंडळींनी त्याला शोधण्यासाठी सुरूवात केली आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी प्रमोदचा मृतदेह मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाबाहेर सापडला.

या आहेत आज दिवसभराच्या सगळ्यात महत्त्वाच्या 6 बातम्या

आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोदने आणखी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्यात त्यांने त्याच्या काही मित्रांना टॅग केलं होतं. त्या पोस्टमध्ये 'चला आज एक मराठा जातोय...पण मराठा आरक्षणासाठी काहीतरी करा. प्रमोद पाटील मराठा आरक्षणाचा चौथा बळी' असं त्याने लिहलं होतं. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आणखी किती बळी जाणार असा प्रश्न उपस्थित होतो.

27 दिवसांनंतर संपली मृत्यूशी झुंज, अंधेरी पूल दुर्घटनेतील मनोज मेहता यांचं निधन

प्रमोद हा विवाहित होता. त्याच्या पश्चात त्याला 2 मुलं आहेत. त्याने ग्रामसेवक पदासाठी परिक्ष दिली होती. पण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने आत्महत्या केली. प्रमोदच्या अशा जाण्याने त्याच्या घरांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी दुपारपासून प्रमोद गायब होता. त्याच्या मित्रानी त्याच्या शोध घेतला आणि ही दुखद बातमी समोर आली. पण आपल्या हक्कांसाठी लढा त्यासाठी जीव देणं हा पर्याय नाही असं आव्हान न्यूज 18 लोकमतकडून करण्यात येत आहे.

आरक्षणासाठी बैठकींचं सत्र, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या आमदारांसोबत स्वतंत्र बैठका

First published: July 30, 2018, 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading