Home /News /maharashtra /

Maratha Morcha Andolan: नांदेडमध्ये पोलिसांनी केला लाठीचार्ज

Maratha Morcha Andolan: नांदेडमध्ये पोलिसांनी केला लाठीचार्ज

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

अशोक चव्हाणाच्या घराकडे जाणारे तीनही रस्ते पोलिसांनी केले बंद

  नांदेड, २४ जुलैः नांदेड येथील अशोक चव्हाण यांच्या घराकडे जाणारे तीनही रस्ते पोलिसांनी बंद केले असून, संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलन अधिक हिंसक झाले असून राज्यभर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. दरम्यान, बीड- औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्ता रोको केले आहे. या सर्वात मात्र प्रवाशांचे हाल होत आहेत. नांदेड येथेही मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण आले आहे. आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात ४ ते ५ आंदोलक जखमी झाले. यात महिलांचाही समावेश आहे. नांदेड येथील राज कॉर्नरवर तणाव वाढत चालला आहे. मराठा मोर्चा आंदोलनाकडे आतापर्यंतचे सर्वात शिस्तबद्ध आंदोलन म्हणून पाहिले जात होते. मात्र आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमधून मुंबई, पुणे, सातारा, सोलापूरला वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती मूक मोर्च्यात ‘एक मराठा लाख मराठा’ अशी साद घालत रस्त्यावर उतरला होता. मराठवाड्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरील गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. त्यामुळे गंगापूर तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीनही जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झालाय. कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर शहरातली अनेक दुकानं व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केली असून, एसटीची सेवा ही तुरळक प्रमाणामध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले आहेत. दरम्यान, सकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेही वाचाः

  सकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंदची हाक

  पुन्हा एका मराठा कार्यकर्त्याने नदीत टाकली उडी, गंभीर जखमी VIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की मराठा मोर्चातील काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर
  First published:

  Tags: Ashok chavan, Maratha kranti morcha, Mumbai, अशोक चव्हाण, नांदेड, मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र बंद

  पुढील बातम्या