राज्यात झालेल्या हिंसाचाराचा क्रांती मोर्च्याशी संबंध नाही, मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

राज्यात झालेल्या हिंसाचाराचा क्रांती मोर्च्याशी संबंध नाही, मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे

  • Share this:

परळी, २ ऑगस्ट-  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला होता. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात जो हिंसाचार झाला त्याचा क्रांती मोच्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापुढे मागण्यांसाठी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर मोर्चा सुरूच राहिल असे आंदोलकांनी स्पष्ट केले. तसेच आरक्षाबाबत चंद्रकांत दादा पाटील यांची उप- समिती तात्काळ बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली.

यापुढील मोर्चाला कशापद्धतीने दिशा द्यायची तसेच पुढील आंदोलनाचे निर्णय परळी येथूनच घेण्यात येतील. आज परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. या बैठकीत यापुढे सरकारसोबत चर्चा करण्यासाठी वेगळी समिती तयार करण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनामुळे जी हिंसा झाली, त्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त केली जात असून आंदोलनात असामाजिक तत्त्व घुसल्यामुळे हिंसाचार घडला असे आंदोलकांनी स्पष्ट केले. मोर्च्याचा उद्देश सपूर्ण राज्यात फक्त ठिय्या आंदोलन करणं हाच होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चाकणमध्ये केलेल्या हिंसाचाराप्रकरणी आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. यात २० जणांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापासून या अटक सत्राला सुरूवात झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या या समाज कंटकांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत, असं एसपी संदीप पाटील यांनी दिली आहे. चाकणमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. राज्यात कुठे नाही तेवढा विध्वंस पाहायला चाकणमध्ये मिळाला. चाकणमध्ये चाललेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडी आणि जाळपोळीत खासगी आणि सरकारी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या जाळपोळीत सरकारचं सुमारे ८ कोटींचं नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात ३ हजार आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यावर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

चाकणमध्ये आंदोलकांनी तब्बल १०० ते १५० गाड्या आंदोलकांनी फोडल्या. चाकणजवळच्या तळेगाव चौकात आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलंय. संध्याकाळी चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. चाकणमध्ये उसळलेल्या हिंसाचारामध्ये आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ले केले होते. यामध्ये पोलीस कर्मचारी अजय भापकर जबर जखमी झालेत. यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजिस्विनी सावंत, पोलीस उप अधीक्षक गणपत माडगुळकर, चाकणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे ,राम पठारे यांच्या सह अन्य दोन कर्मचारी जखमी झाले होते, या सर्वांवर उपचार करण्यात आले असुन सर्वांची प्रकृति स्थिर आहे.

हेही वाचा-

एकीकडे मराठा मोर्चा समन्वयकांची तर दुसरीकडे भाजप आमदारांची आरक्षणावर बैठक

VIDEO : फिट राहण्यासाठी घरबसल्या करा हे झटपट व्यायाम

VIDEO : नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीची लोकांना शिवीगाळ,व्हिडिओ व्हायरल

 

First published: August 2, 2018, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading