औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

जगन्नाथ बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या शेतात पडलेले आढळले

  • Share this:

औरंगाबाद, २५ जुलैः कन्नड तालुक्यात विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जगन्नाथ सोनवणे असे त्यांचे नाव असून त्यांनी कन्नड येथील देवगाव रंगारी येथे विष प्राशन केले होते. जगन्नाथ बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या शेतात पडलेले आढळले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात नेले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, उस्मानाबादमध्ये कृष्णा बाबासाहेब गंभीरे या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उस्मानाबाद जिल्हयातील कळंबचा तो रहिवासी आहे. शिर्डीत पायी वारीत असताना मोबाईलवर बातमी पाहिल्यानंतर कृष्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात असून तरुणाची प्रकृती स्थिर आहे. मराठा आरक्षणासाठी औंरगाबादच्या काकासाहेब शिंदेंनी काल गोदावरीत उडी मारली आणि आंदोलनादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिसंक वळण मिळालं.

आज २५ जुलैला या आंदोलनाची झळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना बसणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, सातारा या प्रमुख शहरांमध्ये आज आंदोलन करण्यात येणार आहे. नवी मुंबई येथील घणसोली येथे आज पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंतची बेस्ट सेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे- वाशी रेल्वेने प्रवास करणं सोयीस्कर ठरणार आहे. नवी मुंबईतील अनेक शाळा कॉलेजमधील मुलांना कोणतीही पूर्व कल्पना न देता घरी पाठवण्यात आले. या सगळ्या गदारोळात सर्वसामान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईत आयोजीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान येत्या 9 ऑगस्टला आंदोलकांकडून ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला. ठाण्याच्या तीन हात नाका ते ज्ञानसाधना कॉलेज रोड आंदोलनकर्त्यांकडून जाम करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मोर्चेकरांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. या सगळ्याचा अंदाज घेत पोलिसांचा मोठा ताफा जागोजागी तैनात करण्यात आला आहे. पण मोर्चेकरांच्या गर्दीने ठाणे पूर्व मार्ग पूर्णपणे जाम झाला आहे.

- संदीप सोनवलकर

हेही वाचा-

लोकलच्या दारात पदर अडकला,जीव थोडक्यात वाचला

भिवंडी 3 मजली इमारतीचा भाग कोसळला, 5 बचावले पण 1 महिलेचा मृत्यू

पाकिस्तानात पंतप्रधानांच्या गादीवर कोण बसणार? आज मतदानाला सुरूवात

 

First published: July 25, 2018, 10:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading