'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'

'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'

पुण्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबाजवणीसाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे रॅली काढण्यात येणार

  • Share this:

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसागणिक चिघळताना दिसत आहे. मराठा मोर्चा क्रांतीचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नसल्याचे राज्य मराठा मोर्च्याचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे. याबद्दल बोलताना वीरेंद्र म्हणाले की, आम्हाला काय हवे आहे आणि आमची भूमिका काय आहे हे आम्ही स्पष्ट केले आहे. समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटाला जाणार असल्याचे वृत्त खोटं असून, कोणीतरी अफवा पसरवत आहे. तसेच आम्ही नारायण राणे यांच्यासोबतही नाही असे पवार यांनी स्पष्ट केले. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत निर्णय घ्यावा, असे वीरेंद्र पवार यांनी सांगितले. पुण्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबाजवणीसाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे रॅली काढण्यात येणार आहे. डेक्कन जिमखान्यावरील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रॅलीची सुरुवात होऊन शिवाजीनगर येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता होणार आहे. राज्यात ठिकठिकाणी जी आंदोलनं झाली त्यातील मृत आणि जखमींना तातडीने मदत द्या, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या अशाही मागण्या रॅलीद्वारे केल्या जाणार आहेत.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. या पत्रकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जाहीर स्पष्टीकरण द्यावे आता या पुढे कुणाचीही मध्यस्थी खपवून घेतली जाणार नाही असा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने घेतलाय. या पत्रकात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दोन जणांचा हकनाक बळी गेलाय याला सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहे. शांततेनं सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करून आंदोलनाला गालबोट लावले आहे असा आरोपही समितीने केलाय.

आरक्षणाच्या घटना दुरुस्तीसाठी सरकार तयार असल्यास मी स्वत: पुढाकार घेईन असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी पूर्ण करणं अशक्य नाही. त्यामुले राजकारणमध्ये न आणता प्रश्न सुटावा यासाठी आपण प्रयत्न करु असंही ते म्हणालेत. तर मुख्यमंत्री बदल हा भाजपचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यात मराठा- ब्राम्हण हा वाद आणण्याची गरज नाही, असंही पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा-

दापोली अपघात- ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले, २५ तासांनी बचावकार्य पूर्ण

नरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य

पुण्यात गांज्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

 

First published: July 29, 2018, 1:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading