औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरांची 'जलसमाधी'

औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरांची 'जलसमाधी'

औरंगाबादमध्येही मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 23 जुलै : औरंगाबादमध्येही मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क जलसमाधी आंदोलन केलं आहे. कायगाव टोक येथीस गोदावरी नदीकाठावर त्यांनी हे आंदोलन केलं आहे. कायगाव टोक परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक शांतीपूर्ण मार्गाने मूक मोर्चे काढून मराठा आरक्षणासाठी सरकार कडे शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी केली होती. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार कडून होत असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.

परभणीत मराठा कार्यकर्ते पेटले, पोलीस व्हॅनसह जाळल्या 6 बसेस

तर दुसरीकडे परभणीतही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पेटवलं आहे. गंगाखेडमध्ये 4 खासगी गाड्या, 5 बसेस, पोलिसांची व्हॅन आणि एक बस जाळण्यात आली आहे. या आंदोलनामुळे गंगाखेड परिसराला दंगलीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे गंगाखेड बंदची हाक हिसंक वळणार नेण्यात आली असंच म्हणावं लागेल.

मराठा कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे 2 वार्ताहार जखमी झाले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात जखमी झालेल्यांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर ठिकठिकाणी मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी राडा घातला आहे.

हेही वाचा...

'तेल गेलं तूप गेलं...' कटरने कापलं एटीएम आणि...!

VIDEO : अन् मराठा मोर्चात अवतरले 'मुख्यमंत्री'

आषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन

First published: July 23, 2018, 2:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading