मराठा मोर्चेकरांचं टोकाचं पाऊल, मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरीत सोडली

मराठा मोर्चेकरांचं टोकाचं पाऊल, मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरीत सोडली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरी नदीत अर्पण केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 23 जुलै : औरंगाबादमध्येही मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क जलसमाधी आंदोलन केलं आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरी नदीत अर्पण केली आहे. कायगाव टोक येथीस गोदावरी नदीकाठावर त्यांनी हे आंदोलन केलं आहे. कायगाव टोक परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. थोड्याच वेळात कार्यकर्ते नदीत उड्या मारून आंदोलन करणार आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक शांतीपूर्ण मार्गाने मूक मोर्चे काढून मराठा आरक्षणासाठी सरकार कडे शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी केली होती. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार कडून होत असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.

औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरांची 'जलसमाधी'

तर दुसरीकडे परभणीतही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पेटवलं आहे. गंगाखेडमध्ये 4 खासगी गाड्या, 5 बसेस, पोलिसांची व्हॅन आणि एक बस जाळण्यात आली आहे. या आंदोलनामुळे गंगाखेड परिसराला दंगलीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे गंगाखेड बंदची हाक हिसंक वळणार नेण्यात आली असंच म्हणावं लागेल.

हेही वाचा...

परभणीत मराठा कार्यकर्ते पेटले, पोलीस व्हॅनसह जाळल्या 6 बसेस

'तेल गेलं तूप गेलं...' कटरने कापलं एटीएम आणि...!

Video- गौतम गंभीरच्या मुलीने दिली यो- यो परीक्षा

 

First Published: Jul 23, 2018 02:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading