मराठा समाजाकडून पक्षाची स्थापना, उदयनराजेंचे बॅनर्स झळकावले

मराठा समाजाकडून पक्षाची स्थापना, उदयनराजेंचे बॅनर्स झळकावले

आज रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.

  • Share this:

विकास भोसले, प्रतिनिधी

सातारा, 08 नोव्हेंबर : मराठा मोर्चाचा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहुर्तावर रायरेश्वर किल्ल्यावर पक्षाची स्थापना केली असून या पक्षाच नावं महाराष्ट्र क्रांती सेना असं ठेवण्यात आलं आहे

आज रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजेंचे फोटो असलेले बॅनर्स पहायला मिळाले.

या कार्यक्रमास शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तसंच उदयनराजे भोसले यांनी संपूर्ण पाठिंबा दिला असून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उदयनराजे हे आमचे पुढचे उमेदवार असू शकतात आपण आमच्या पक्षातून निवडणूक लढवावी तशी विनंती राजेंना करणार असल्याचं महाराष्ट्र क्रांती सेनेचे पक्ष प्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितलंय.

दोन महिन्यांपूर्वी सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर पक्षाची घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा मोर्चा धुमसत आहे. पण अद्याप यातील कोणतीच मागणी मार्गी लागली नाही. सध्याच्या राजकारणात प्रत्येक पक्षात मराठी समाजातील लोक आहेत. पण तरीही मराठा समाजावर अन्याय होत आहे. प्रत्येक जण स्वत:च्या समाजाचा फायदा बघत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यासाठी शिक्षण व्यवस्था सुधारावी, मराठ्यांना नोकरीत आरक्षण मिळावं यासाठी हा नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

खरं तर गेले २५ वर्षे विविध मार्गांनी शासनाशी संघर्ष सुरू आहे, परंतु कोणत्याही सरकारने मराठा समाजाची दखल घेतलेली नाही, असं सुरेश पाटील यांनी म्हटलं होतं.

====================================

First published: November 8, 2018, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading