• होम
  • व्हिडिओ
  • '...तर कोल्हापुरी हिसका दाखवू', ओवीसींच्या 'त्या' वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक
  • '...तर कोल्हापुरी हिसका दाखवू', ओवीसींच्या 'त्या' वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Feb 7, 2019 04:58 PM IST | Updated On: Feb 7, 2019 05:01 PM IST

    कोल्हापूर, 7 फेब्रुवारी : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवीसी यांच्याविरोधात कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. 'मराठा समाज हा मोठा भाऊ नाही,' असं वक्तव्य ओवीसींनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. 'मराठा आरक्षणासाठीच्या क्रांती मोर्चावेळी मराठा समाजाला मोठा भाऊ समजून मुस्लीम समाज या मोर्चात सामील झालेला होता, ओवीसींनी दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, 'असं मराठा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे वंचित बहुजन विकास आघाडीच्या कोल्हापुरात 12 फेब्रुवारीला होणाऱ्या मेळाव्यात ओवीसींना विरोध करणार असल्याचं मराठा समाजातील आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी