राज ठाकरेंनी बोलू नये आणि राणेंचीही मध्यस्थी नको,मराठा कार्यकर्त्यांनी बजावले

राज ठाकरेंनी बोलू नये आणि राणेंचीही मध्यस्थी नको,मराठा कार्यकर्त्यांनी बजावले

तसंच उद्या 28 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही समितीने केलीये.

  • Share this:

औरंगाबाद, 27 जुलै : आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा क्रांती मोर्चावर विधान केलं. त्याविषयी औरंगाबादेतील मराठा मोर्चेकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केली आहे. मराठा समाज अनेक दिवसांपासून आंदोलन करतोय. पण मराठा समाज हा एवढाही मुर्ख नाही.  राज ठाकरे यांनी मराठ्यांच्या लढ्यात लक्ष देऊ नये असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे तर स्वतःहून मध्यस्थी करणाऱ्या नारायण राणे यांनाही मराठा समाजाने सल्ला दिला आहे. मराठा समाज जाळपो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाशीही चर्चा न करता मराठा समाजशी संवाद पत्रकार परिषद घेऊन करावा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

तसंच मराठा क्रांती मोर्चानेही एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जाहीर स्पष्टीकरण द्यावे आता या पुढे कुणाचीही मध्यस्थी खपवून घेतली जाणार नाही असा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने घेतलाय. या पत्रकात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दोन जणांचा हकनाक बळी गेलाय याला सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहे. शांततेनं सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करून आंदोलनाला गालबोट लावले आहे असा आरोपही समितीने केलाय.

पेच येणार नाही, सरकार मराठा आरक्षण देऊ शकते-नारायण राणे

तसंच उद्या 28 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही समितीने केलीये. आजपर्यंत आम्ही 58 मुक मोर्चे काढून 58 निवदेनं दिली. सरकारने नेमलेल्या उपसमितीसोबत वारंवार चर्चा केली पण काहीही ठोस निर्णय घेतला गेला नाही. मराठा समाजाच्या भावनाचा आदर करून सरकारने निर्धारीत आणि ठोस लेखी आश्वासन द्यावे अशी मागणीही मराठा समितीने केलीये.

PHOTOS : चंद्रग्रहण का आहे महत्त्वाचे?, जाणून घ्या ही 5 कारणं

मागील काही दिवसांत आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मुंबई, नवी मुंबईत काही समाजकंटकानी घुसखोरी करून आंदोलनला हिंसक रूप दिले आहे. त्यामुळे मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल होत आहे ते मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावी अशी मागणीही समितीकडून करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

कोणत्याही इतर राज्यापेक्षा आतापर्यंत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे आधी मराठी मुलांना नोकऱ्या मिळू द्या. आम्हाला जातनिहाय आरक्षण नको आहे. आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिलं पाहिजे. स्थानिकांना जर इथे विविध संस्थांमध्ये 80 टक्के नोकऱ्या मिळत असतील तर आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे खरे की स्टंटबाजी ? हे आहे सत्य

सरकार खाजगी संस्थांना प्रोत्साहन देतंय आणि सरकारी संस्था बंद पाडतंय. मग आरक्षण देणार कोण आणि त्याचा उपयोग तरी काय असा सवालही राज यांनी विचारलाय. या आरक्षणाच्या नादाच काकासाहेब शिंदे यांचा हकनाक बळी गेला, हे सरकार फक्त तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व पक्ष फक्त मतांसाठी तुम्हाला खेळवत आहेत, अशा शब्दात राज यांनी भाजपवर तोफ डागली.

काय म्हणाले होते नारायण राणे?

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जाळपोळ सुरू, सरकार ही आरक्षण वतीने प्रतिक्रिया देतात. आंदोलनाने हिंसक वळण घेतले ते थांबावे यासाठी मुख्यमंत्र्यांना मी भेटलो. सरकार हे आंदोलन थांबल्यास ठराविक महिन्यात करायला तयार आहे. राज्यात आंदोलन जे सुरू ते थांबावे ही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे असं राणेंनी सांगितलं. आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आमची आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना यांना भेटून आरक्षण बाबत संघटना मागणी समोर ठेवेल असं आश्वासन राणेंनी दिलं.

मराठा क्रांती मोर्चाचे पत्रक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading