मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आमदाराला शिवसेनेची तंबी

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आमदाराला शिवसेनेची तंबी

मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाला पाठिंबा देत हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै  : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेनं चांगलीच तंबी दिलीये. मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करू नका असा निरोपच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिलाय. शिंदे यांनी फोन करून हर्षवर्धन जाधव यांना चांगलाच समज दिला.

मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. नुसता राजीनामा दिला नाहीतर त्यांनी सोमवारी विधानभवनाबाहेर ठिय्या आंदोलनही केलं. एवढंच नाहीतर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेवर आणि गृराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली. त्यांच्या  टीकेची पक्षांन गंभीर दखल घेतलीय. गेले दोन दिवस मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना एकनाथ शिंदे यांनी ताकीद दिलीये. मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करू नका असा निरोप एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन जाधव यांना दिलाय.

विशेष म्हणजे असलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाला पाठिंबा देत हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर काल ते मातोश्रीवर गेले असता उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली होती. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीवरुन त्यांनी कालपासून मुंबईमध्ये धरणे आंदोलन सुरू केलंय. ते घेत असलेल्या या भूमिकांमुळे पक्ष अडचणीत येत असल्याचं कारण देत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन जाधव यांना समज दिली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आणखी एका तरुणानं आत्महत्या केलीय. बीड जिल्ह्यातील विडा या गावातील अभिजित बालासाहेब देशमुख या ३५ वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला अभिजित देशमुखनं नैराश्यातून हे टोकाचं पाऊल उचललं. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीत त्यांनी आपल्या औषध-गोळ्यांचा खर्च, बँकेचे कर्ज आणि मराठा आरक्षणामुळे मी जात आहे अस लिहीलं होतं. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू ची नोंद केली असून याचा तपास करत आहेत.

तर  लातूर जिल्ह्यातील औसा तहसील समोर मराठा आरक्षणच्या मागणीसाठी युवकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आरक्षणची मागणी करत, घोषणा देत दोन युवकांनी अंगावर रॉकेल आतून घेतलं. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संतप्त तरूणांना रोखलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

हेही वाचा

मराठा आरक्षण : सत्तेतल्याच काही लोकांचा आग भडकवण्याचा प्रयत्न - राणेंचा गंभीर आरोप

PHOTOS : सांगलीत 'खेळ चाले', प्रत्येक वळणावर लिंबू-अंडी टाकली

 

First published: July 31, 2018, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading