'त्या' पोलिसाच्या पाठीवर बुटाचा ठसा कुणाचा ?, हे आहे सत्य

'त्या' पोलिसाच्या पाठीवर बुटाचा ठसा कुणाचा ?, हे आहे सत्य

या पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीवर बुटाचा ठसा आहे. आणि यासोबत तुम्ही पायाने पाठीवर शाबासकी देण्यापेक्षा हाताने दिली असती तर खूप छान वाटलं असतं असा मेसेज पसरवला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : व्हाॅट्सअॅपवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अलीकडे व्हाॅट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आणि पोस्टमुळे निष्पाप लोकांचा जमावाच्या मारहाणीत बळी गेलाय. गेल्या तीन दिवसांपासून मराठा ठोक मोर्चाचे राज्यभरात आंदोलनं सुरू आहे. या आंदोलनादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झालाय. या पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीवर बुटाचा ठसा आहे. आणि यासोबत तुम्ही पायाने पाठीवर शाबासकी देण्यापेक्षा हाताने दिली असती तर खूप छान वाटलं असतं असा मेसेज पसरवला जात आहे. पण या फोटोची सत्यता पडताळून पाहिली असता या फोटोबाबत काही माहिती समोर आलीये.

 

दिवसभरात ‘या’ ठिकाणी पेटलं मराठा आंदोलन

फोटोमध्ये एक पोलीस दोन पोलीस कर्मचारी उभे आहे. एक पोलीस पाठ करून तर दुसरा पोलीस कर्मचारी त्याच्यासमोर उभा आहे. पाठ करून उभा असलेल्या पोलिसाच्या पाठीवर कुणी तरी लाथ मारल्यानंतर बुटाचा ठसा उमटला असं हे दृश्य आहे. पोलिसांवर हात उचलले म्हणजे आपल्याच रक्षकाचा अपमान करण्यासारखं आहे. मराठा मोर्च्याचा दरम्यान पोलिसाला अशा मारहाण करण्यात आली असं व्हायरल होत आहे.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच!, शिवसेना आमदाराचा राजीनामा

पण हा फोटो जर निरखून पाहिला तर या फोटोमध्ये फोटोशाॅपद्वारे छेडछाड करण्यात आल्याच स्पष्ट दिसून येतं. या फोटोमध्ये एक ट्रक आणि समोर शाळेची बस उभी आहे. ट्रकची तर नंबर प्लेट दिसत नाही पण बसची नंबर प्लेट खोडण्यात आली आहे. जेणे करून हा फोटो कुठला आहे याचे ठिकाण कळू नये म्हणून...

चर्चेला तयार!,तीन दिवसांनंतर मुख्यमंत्री मराठा मोर्च्यावर बोलले

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोटो हा एका अपघात स्थळाचा आहे. फोटोमध्ये दिसणारी शाळेची बसही डिव्हायडरवर चढलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालीये. तसंच कोणताही फोटो हा कुठून आणि कसा आला याची माहिती फोटोसोबतच असते. प्रत्येक फोटोला exif data असतो. या फोटोचा डेटा पाहिला असता हा फोटो 22 आॅगस्ट 2017 असल्याचं सांगितलं जातंय. हा डेटा तुम्हाला फोटोवरून ही मिळतो आणि exifdata.com या संकेतस्थळावरूनही डेटा मिळतो. एकंदरीतच कुणाचाही कुणाशी संबंध जोडून सोशल मीडियावर शेअर करणे हे नवीन नाही पण एखाद्या संवेदनशील विषयावर भाष्य करत असताना थोडी खबरदारी घेतली पाहिजे. तरच त्याला खऱ्या अर्थाने 'सोशल' मीडिया म्हणता येईल.

First published: July 25, 2018, 9:47 PM IST

ताज्या बातम्या