चंद्रपूरमध्ये 3 रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची माओवाद्यांची धमकी

चंद्रपूरमध्ये 3 रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची माओवाद्यांची धमकी

चंद्रपुर शहरालगत असलेल्या चांदा फोर्ट, मुल आणि नागभीड या तीन रेल्वे स्थानकासंदर्भात पञात उल्लेख असून माओवाद्याचा शहीद सप्ताहाचाही त्यात उल्लेख आहे.

  • Share this:

29 जुलै : चंद्रपूर जिल्हयातील तीन रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवण्याची धमकी असलेले माओवाद्याचा उल्लेख असलेलं पञ मिळाल्यानं खळबळ उडालीये.

चंद्रपुर शहरालगत असलेल्या चांदा फोर्ट, मुल आणि नागभीड या तीन रेल्वे स्थानकासंदर्भात पञात उल्लेख असून माओवाद्याचा शहीद सप्ताहाचाही त्यात उल्लेख आहे. त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी गंभीरतेने याकडे लक्ष केंद्रीत केलंय.

दिल्ली हैदराबाद असा दक्षिण भारताला जोडणारा रेल्वे ट्रॅक या रेल्वे स्थानकासह जिल्हयातुन जात असल्यानं रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. तर  तेलंगणालगत असलेल्या रेल्वे ट्रॅकची तपासणी सुरू आहे.

First published: July 29, 2017, 10:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading