Home /News /maharashtra /

2 वनरक्षकांना जंगलात नेऊन झाडाला बांधून केली मारहाण, माओवाद्यांच्या कृत्याने गडचिरोलीत खळबळ

2 वनरक्षकांना जंगलात नेऊन झाडाला बांधून केली मारहाण, माओवाद्यांच्या कृत्याने गडचिरोलीत खळबळ

जंगलात घेऊन गेल्यानंतर झाडाला बांधले आणि इथून पळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठार मारू अशी धमकी देऊन त्यांना बेदम मारहाण केली.

गडचिरोली, 12 जानेवारी : गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यात भामरागड (bhamragad) तालुक्यात कामावर गेलेल्या दोन वनरक्षकांना ( forest workers) माओवाद्यांनी (Maoists ) बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीनंतर त्यांचे मोबाईल आणि जीपीएस यंत्र हिसकावून घेतले आहेत. या घटनेने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, परत एकदा वनविभागाचे कर्मचारी माओवाद्यांच्या लक्ष्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. भामरागड तालुक्यात नारगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विसागुंडा गावाजवळ वन तलावाचे काम सुरू होणार होते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या तलावाच्या  कामाची पाहणी करण्यासाठी भामरागड वन विभागाचे दोन वनरक्षक या भागात गेले होते. युकेश राऊत आणि जागेश्वर सुरगाये हे दोन वनरक्षक कामाच्या ठिकाणी गावकऱ्यांशी चर्चा करुन परत येत असताना विसामुडी नाल्याजवळ काही माओवादी त्या ठिकाणी आले आणि नाल्याजवळ माओवाद्यांनी दुचाकीवर जाणाऱ्या दोन वनरक्षकांना अडवून जंगलात घेऊन गेले. (पुण्यातला गाणारा पोलीस पुन्हा चर्चेत; 'पुष्पा'च्या श्रीवल्लीचा केला रावडी मराठी) जंगलात घेऊन गेल्यानंतर झाडाला बांधले आणि इथून पळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठार मारू अशी धमकी देऊन त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर माओवाद्यांनी त्यांची मोटरसायकल दोन मोबाईल, जमीन मोजणी करण्याचे जीपीएस यंत्र आणि नोंदवही हिसकावून नेले. तिथून कशीबशी सुटका करुन परत आले. भामरागड पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या दोन्ही वनरक्षकांना भामरागडमध्ये प्रथम उपचार केल्यानंतर अहेरी येथे आणून पुढील उपचार सुरू आहे. गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक किशोर मानकर यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश भामरागडचे उपवनसंरक्षक पांडे यांना दिले आहेत. (आता रडत नाही हसत कापा कांदा; या कांद्यामुळे डोळ्यातून एक थेंबही पाणी येणार नाही) यापूर्वीही माओवाद्यांनी वन विभागाच्या कामाला विरोध केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता परत एकदा माओवाद्यांनी वन कर्मचाऱ्यांना मारहाण करून वन विभाग लक्ष्यावर आल्याचा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, जिल्ह्यात होणाऱ्या विकास कामांना माओवादी नेहमीच विरोध करीत आले आहेत. माओवाद्यांनी नेहमीच विकासकामांना विरोध केला असून  या घटनेच्या संदर्भात तपास सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती अंकित गोयल यांनी दिली आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या