गडचिरोली, 10 जून : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. माओवाद्यांनी वनपरिक्षेत्रातील कार्यालयाची तोडफोड करून जाळपोळ केली आहे. एवढंच नाहीतर दोन वनरक्षकांना बेदम मारहाणही केली आहे.
गडचिरोलीत माओवाद्यांनी एटापल्ली तालुक्यात गट्टा जांबिया येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात मध्यरात्री प्रवेश केला होता. माओवाद्यांनी कार्यालयात प्रवेश करुन दोन वन रक्षकांना बेदम मारहाण करुन मोबाईल हिसकावून नेले. या दोन्ही वनरक्षकांना लाठ्या काठ्या आणि बेल्टाने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोन्ही वनरक्षकांना गंभीर दुखापत झाली आहे.
हेही वाचा -कुत्र्याने पाठलाग करून हरणाला ठार मारले, बारामती शिकारीची धक्कादायक घटना उघड
वनरक्षकांना मारहाण केल्यानंतर माओवादी एवढ्यावरच थांबले नाही. त्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन तोडफोड करुन कार्यालयाची जाळपोळ केली. कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केली आणि दस्ताऐवजही जळून टाकले.
विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी हे कार्यालय माओवाद्यांनी जाळले होते. आज झालेल्या या घटनेमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून जंगलातली कामे कशी करायची असा सवाल वनविभागाच्या पुढे उपस्थितीत केला आहे.
माओवाद्यांची 2 कोटींची रसद रोखली
दरम्यान, 04 जून रोजी माओवाद्यांना तब्बल 2 कोटी 20 लाखांची रसद पुरवली जात असल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सिरोंचा लगत महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील तपासणीत 2 कंत्राटदारांकडून 2 कोटी 20 लाख रुपयाची रक्कम पोलिसांनी जप्त केली होती. तेंदूपत्ता कंत्राटराकडून 2 कोटी 20 लाख रुपये जप्तप्रकरणी माओवाद्यांना आर्थिक मदतीच्या संशयावरुन चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा -मोठी बातमी! शाळा-महाविद्यालयासाठी सम-विषम फॉर्म्युला, 6 टप्प्यात सुरू होणार
तेंदूपत्ता हंगाम सुरू असून अतिसंवेदनशील भागात तेंदुपत्ता तोडायचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटराकडून माओवाद्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नेण्यात येतं असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं. त्यामुळे UPA बेकायदेशीर प्रतिबंधक कायद्यान्वये तेलंगणाच्या बडया कंत्राटदारासह चौघांवर सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.