छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ; जाळली 1 कोटींची वाहनं

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ; जाळली 1 कोटींची वाहनं

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा मोठा धुमाकूळ घातला आहे. यात त्यांनी चक्क 1 कोटींची वाहनं जाळून टाकली आहेत. त्यामुळे छत्तीसगड परिसरात गंभीर वातावरण निर्माण झालं आहे.

  • Share this:

14 मार्च : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा मोठा धुमाकूळ घातला आहे. यात त्यांनी चक्क 1 कोटींची वाहनं जाळून टाकली आहेत. त्यामुळे छत्तीसगड परिसरात गंभीर वातावरण निर्माण झालं आहे. रस्त्याच्या कामासाठी उभ्या असणाऱ्या रोड रोलर, जेसीबी यांसारख्या मोठ्या गाड्या माओवाद्यांकडून जाळण्यात आल्या आहेत. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात गंगलुर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

रस्त्याच्या कामावरील 1 कोटीची वाहने माओवाद्यांनी जाळली आहेत. यात 2 रोड रोलर, जेसीबी मशीनसह काही मोठया वाहनांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हयाला लागुन असलेल्या बिजापुर जिल्हयात गंगलुर जवळ रस्त्याच काम सुरु असताना माओवाद्यांनी ही जाळपोळ केली आहे. यात सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे.

(सविस्तर बातमी लवकरच...)

 

First published: March 14, 2018, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading