मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /माओवाद्याचा मृतदेह घेऊन जात असताना हेलिकॉप्टवर फेकले होते बॉम्ब, गडचिरोलीत थरारक घटना

माओवाद्याचा मृतदेह घेऊन जात असताना हेलिकॉप्टवर फेकले होते बॉम्ब, गडचिरोलीत थरारक घटना

गडचिरोलीत पोलिसांनी महत्त्वाची कारवाई

गडचिरोलीत पोलिसांनी महत्त्वाची कारवाई

गडचिरोली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Gadchiroli, India

महेश तिवारी, प्रतिनिधी

गडचिरोली, 1 एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. माओवाद्यांच्या गडात घुसल्यावर माओवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. माओवाद्यांनी केलेला हा हल्ला परतवला आहे. गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत एका माओवाद्याला कंठस्नान घालण्यातही पोलिसांना यश आले आहे.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर अबूजमाडच्या जंगलामध्ये कंपनी 10 या माओवाद्यांच्या दलमचे लोकेशन होते. 200 c 60 कमांडो जवानांनी काल रात्रीपासून या भागात विशेष अभियान राबवायला सुरुवात केली होती. घनदाट जंगल, मोठे नाले पार करुन आज सकाळी माओवाद्यांच्या लोकेशनवर जवान पोहोचले. मात्र, जवान याठिकाणी पोहोचताच माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. घनदाट जंगल, उंच पर्वतरांगा असलेल्या माओवाद्यांच्या या बालेकिल्ल्यात माओवाद्यांनी केलेल्या या गोळीबाराला पोलीस जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत हा हल्ला परतावून लावला. तसेच एका माओवाद्याला ठार केले. एक तास ही चकमक सुरू होती.

घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेले साहित्य.

घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेले साहित्य.

उल्लेखनीय म्हणजे याच भागात 2015 मध्ये दोन जवानांना वीरमरण झाले होते. त्या ठिकाणी या माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. यानंतर माओवाद्याचा मृतदेह आणण्यासाठी गेलेल्या हेलीकॉप्टरवर माओवाद्यांनी बॅरल ग्रेनेड लाँचरने हल्ला केला. मात्र, पायलटच्या सतर्कतेने हेलिकॉप्टर सुरक्षित उडाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. चकमकीनंतर सॅटेलाइट फोनवरुन माहिती मिळाल्यानंतर मृतदेह आणि साहित्य आणण्यासाठी हेलीकॉप्टर पाठवण्यात आले होते. तेथील एका शेतात हे हेलिकॉप्टर उतरल्यावर मृतदेह आणि साहित्य घेऊन उडताना माओवाद्यांनी हा हल्ला केला.

गावात कोंबडी चोरायला आले, अन् 19 वर्षांच्या तरुणासोबत घडलं भयानक कांड!

त्यानंतर हेलीकॉप्टरच्या सुरक्षेसाठी तैनात जवानानी माओवाद्याच्या दिशेने युबीजीएल म्हणजे अंडर बॅरल ग्रेनेड लाँचरचा मारा केला. घटनास्थळी तीन बंदुकासह इतर माओवादी साहित्य सापडले आहे. तर हेलिकॉप्टरने माओवाद्याचा मृतदेह गडचिरोलीत आणण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Gadchiroli