गडचिरोलीत मतदानानंतर सुरक्षा पथकावर माओवाद्यांचा हल्ला, गोळीबारानंतर नक्षलवादी जंगलात पसार

पुरसलगोंदीच्या मतदान केंद्रावरुन निघालेल्या पथकाला बेस कॅम्पजवळ माओवाद्यांनी लक्ष्य केलं. माओवाद्यांनी आईडीचा स्फोट घ़डवून आणला. यात तीन जवान गंभीर जखमी झाले. नंतर माओवाद्यांनी कमांडो पथकावर अंदाधूंद गोळीबारही केला. जवानांनी माओवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

पुरसलगोंदीच्या मतदान केंद्रावरुन निघालेल्या पथकाला बेस कॅम्पजवळ माओवाद्यांनी लक्ष्य केलं. माओवाद्यांनी आईडीचा स्फोट घ़डवून आणला. यात तीन जवान गंभीर जखमी झाले. नंतर माओवाद्यांनी कमांडो पथकावर अंदाधूंद गोळीबारही केला. जवानांनी माओवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

  • Share this:
    गडचिरोली, 11 एप्रिल- लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर माओवाद्यांनी सुरक्षा पथकावर दिवसभरात तिसऱ्यांदा हल्ला केला आहे. मतदान पथकाच्या सुरक्षेसाठी अतिसंवेदनशील भागात तैनात C 60 कमांडो पथकावर माओवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन गंभीर जवान जखमी झाले आहेत. पुरसलगोंदीच्या मतदान केंद्रावरुन बेस कॅम्पवर परतणाऱ्या C 60 कमांडो पथकाला माओवाद्यांनी टार्गेट केलं. मतदान झाल्यानंतर स्फोट घडवण्यासाठी माओवाद्यांनी आधीच आयईडी स्फोटके पेरली होती. दुपारी 3 वाजता हल्ला झाला. एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदी परिसरात घटना घडली. दरम्यान, माओवाद्यांनी सकाळी आईडीचा स्फोट घडवून आणला होता. माओवाद्यांनी कमांडो पथकावर अंदाधूंद गोळीबारही केला. यात तीन जवान जखमी झाले. जवानांनीही माओवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. जखमी जवानांना हॅलिकॅाप्टरने नागपुरला रवाना करण्यात आले आहे. जवानांना घेण्यासाठी आलेल्या हॅलीकॅाप्टरवरही माओवाद्यांनी गोळीबार केला. धानोऱ्याजवळील तुमडीकसा येथे निवडणूक पथकावर हल्ला धानोऱ्याजवळील तुमडीकसा येथे निवडणूक पथकावर माओवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या गोळीबारानंतर माओवादी जंगलात पसार झाले. मतदान न करण्याच्या नागरिकांना दिल्या होत्या धमक्या माओवाद्यांचा लोकसभा निवडणुकीला विरोध आहे. मतदान न करण्याच्या माओवाद्यांनी नागरिकांना धमक्या दिल्या होत्या. तरी देखील गडचिरोली, चिमुरमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी छत्तिसगडमध्ये देखील हल्ला करण्यात आला होता. यात प्रामुख्याने भाजपच्या आमदारांना लक्ष्य करण्यात आले होते. छत्तिसगडच्या हल्ल्यात आमदारासह इतर 4 जणांचा मृत्यू झाला होता. VIDEO: अमोल कोल्हे यांचा हमीभाव मिळवून देणारा 'शेतकरी अजेंडा'
    First published: