मुंबई, 8 सप्टेंबर : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना अद्यापही कोरोनावर नियंत्रण करण्यात केंद्र सरकारला यश आलेले नाही. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. अनेकांना वाटलं टाळ्या वाजवल्या.. घंटा वाजवल्या की corona जाईल, पण गेला का? अनेकांचा गैरसमज झाला होता. मात्र वास्तव वेगळं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आपल्या इथे लस 15 ऑगस्टला येईल असं जाहीर केलं होतं. पण 15 ऑगस्ट उलटूनही लस आलीच नाही. निवडणुका आल्या मात्र काही राज्यात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर निशाणा साधला.
पुढे ठाकरे म्हणाले की, वस्तू सेवा कराची मोठी रक्कम केंद्राकडे आहे. ती कधी देणार? राज्यातील सर्व नेते एकत्र येत पंतप्रधानांना सवाल विचारणार? फडणवीस यांचे नाव न घेता ठाकरे यांनी जोरदार टीका केली. देशात पंतप्रधानांनी अचानक कडक लॉकडाऊन लागू केला. महाराष्ट्रात मात्र आपण मात्र तसं केलं नाही आणि लाॅकडाऊन हळूहळू उठवला देखील.
हे ही वाचा-विधान परिषद उपसभापती निवडणुकीत सेनेची बाजी, भाजपचा झाला पराभव
काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळीही जीएसटी, जेईई आणि नीटच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यात आली होती. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.
दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाद पेटला आहे. यावर पहिल्यांदाच भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. कंगनाच्या वक्तव्यामुळे मुंबई पोलिसांचा अपमान झाले हे, फडणवीस यांनी मान्य करत निषेध केला. पण, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. कोरोनाच्या परिस्थिती, सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि कंगनाच्या प्रकरणावरही फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.