कर्जमाफी प्रक्रियेत घोळच घोळ, बळीराजा प्रतीक्षेतच

कर्जमाफी प्रक्रियेत घोळच घोळ, बळीराजा प्रतीक्षेतच

कर्जमाफी देताना अनेक तांत्रिक अडचणी येतायत आणि त्यामुळे पैसे खात्यात यायला अजून काही वेळ लागणार, असं दिसतंय.

  • Share this:

25 आॅक्टोबर : सरकारनं दिवाळीआधी कर्जमाफी वाटपाचा सोहळा पार पाडला खरा, पण जमिनीवरचं वास्तव काही वेगळंच आहे. कर्जमाफी देताना अनेक तांत्रिक अडचणी येतायत आणि त्यामुळे पैसे खात्यात यायला अजून काही वेळ लागणार, असं दिसतंय. पहिल्या टप्प्यात 8 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, पण त्यांनाही वाट पहावी लागणार आहे.

त्यामुळे पुढच्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांचा नंबर कधी येणार हा यक्षप्रश्न बळीराजासमोर निर्माण झालाय. शेतकऱ्यांचे आधार कार्ड क्रमांक असोत किंवा कर्जाची मूळ रक्कम, अनेक बाबींमध्ये घोळ सुरूय. एवढंच नाही तर एका शेतकऱ्याचा एकापेक्षा जास्त वेळा यादीत नाव आल्याचंही पुढे आलंय. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया घाईघाईत पार पाडली का, किंवा सरकारची यंत्रणा कमी पडतोय का, असा प्रश्न आता निर्माण होतोय.

कर्जमाफीत नेमके कोणते घोळ समोर आलेत ?

- एका आधार क्रमांकावर अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाची नोंद

- एका शेतकऱ्याचा यादीत अनेकदा समावेश

- कर्जाची मूळ रक्कम आणि थकीत रक्कम यात ताळमेळ नाही

- 56.58 लाखपैकी केवळ 20 लाख शेतकऱ्यांची खाती सुरू ?

- राष्ट्रीयकृत बँकांकडून पुरवलेली माहिती सदोष ?

First published: October 25, 2017, 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading