निवडणूक जाहीर होताच भाजप-सेना युतीला मोठा धक्का, काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू

इगतपुरी आणि श्रीरामपूरमधून अनेकांनी काँग्रेस प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 06:11 PM IST

निवडणूक जाहीर होताच भाजप-सेना युतीला मोठा धक्का, काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू

हरिष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 21 सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. अगदी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर शिर्डीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. इगतपुरी आणि श्रीरामपूरमधून अनेकांनी काँग्रेस प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील सेनेचे लहू कानडेदेखील काँगेसमध्ये गेले आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकेवेळी कानडे यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवली होती. त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

खरंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधी अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे महाराष्ट्र सगळ्याच ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. पण आता निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. दोन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे.

Loading...

इतर बातम्या - मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, महिंद्रा पिकअप आणि कारची धडक

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

- अधिसूचना - 27 सप्टेंबर.

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

- उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

- 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

इतर बातम्या - दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं..

उदयनराजेंना भाजपच्याच इच्छुकांनी दिला धक्का? साताऱ्यात रंगलं पक्षांतर्गत राजकारण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मात्र घोषणा करण्यात आलेली नाही. उदयनराजे भोसले यांच्यासाठी हा धक्का असल्याचं बोललं जात आहे. मात्र या निमित्ताने साताऱ्यातील भाजपमधील राजकारणाचीही जोरदार चर्चा होत आहे.

भाजपच्या सातारा जिल्ह्यातील नेत्यांनाच सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्रित नको होती. उदयनराजेविरोधी जनमताचा आपल्याला फटका नको, असं काही इच्छुक उमेदवारांचं मत होतं. याबाबत भाजप नेत्यांनी मतदारसंघनिहाय आकडेवारीही दिली होती. इतर इच्छुकांसह शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सुद्धा एकत्र निवडणुकीला तयार नव्हते. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सातारा पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावर भाजपमध्येच राजकारण रंगल्याचं दिसत आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्रात आचारसंहिता लागू, सोशल मीडियावर येणार ही बंधनं

उदयनराजे भोसले आणि साताऱ्यातील राजकारण :

खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला.

उदयनराजे भोसले यांनी प्रवेशावेळी भाजपसमोर काही अटी ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी असा आग्रह उदयनराजेंनी धरला होता. आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभेची घोषणा केली आहे. मात्र सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही. त्यामुळे उदयनराजेंना हा धक्का मानला जात आहे.

VIDEO : युतीचं फायनल झालं की नाही? चंद्रकांत पाटील म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...