मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अनेक मुख्यमंत्र्यांना बैठकीच्या खोलीत बंद केलं होतं, गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

अनेक मुख्यमंत्र्यांना बैठकीच्या खोलीत बंद केलं होतं, गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

'मी दोन तीन वेळा बैठक घेतली पण वाद काही मिटला नाही. त्यानंतर राज्या-राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीला बोलावलं'

'मी दोन तीन वेळा बैठक घेतली पण वाद काही मिटला नाही. त्यानंतर राज्या-राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीला बोलावलं'

'मी दोन तीन वेळा बैठक घेतली पण वाद काही मिटला नाही. त्यानंतर राज्या-राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीला बोलावलं'

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 04 ऑक्टोबर :  'आपल्याकडे अनेक गोष्टी करण्यासारखा असतात. पण, वादामुळे काही काम होत नाही. एकदा अनेक बैठकां घेऊनही वेगवेगळ्या राज्यांमध्ये तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना (chief ministers) मी बोलावलं आणि खोलीचं दार बंद केलं. सोल्युशन काढा मगच दार उघडेल ही भूमिका घेतली होती' असा किस्साच भाजपचे नेते आणि केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सांगितला. त्यामुळे एकच हशा पिकली.

आज नाशिकमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या 630 कि.मी लांबीच्या रु.2048 कोटींच्या प्रकल्पाचा लोकार्पण आणि कोनशीला अनावरण झाले. यावेळी गडकरींनी तडाखेबाज भाषण केलं.

'मी जलस्त्रोत मंत्री असताना महाराष्ट्राला 1 लाख कोटी रुपयांचा निधी दिला होता. महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प पूर्ण झाले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील ५० ते ६० प्रकल्प मंजूर झाले आहे. त्यावेळी तीन प्रकल्प खूप महत्त्वाचे होते. मी ज्यावेळी जलस्त्रोत मंत्री होतो १९७० पासून अनेक राज्यांमध्ये वाद होते. मी दोन तीन वेळा बैठक घेतली पण वाद काही मिटला नाही. त्यानंतर राज्या-राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीला बोलावलं. आणि सगळ्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं दार बंद करून घेतलं आहे, तुम्ही जोपर्यंत तोडगा काढत नाही, तोपर्यंत दार उघडणार नाही, अशी तंबीच दिली. त्यानंतर पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल आणि दिल्लीतील प्रकल्पांचा तोडगा निघाला. पण कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद हा कोर्टात गेला होता, त्यामुळे तोडगा निघू शकला नाही' असं गडकरींनी सांगितलं.

बापरे रे बाप! इवल्याशा खारीचा एवढा मोठा 'कार'नामा; पाहूनच तोंडात बोटं घालाल

तसंच, 'त्यावेळी तीन प्रकल्प मंजूर केले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन बैठक घेतली. पण काही तोडगा निघू शकला नाही' असंही त्यांनी सांगितलं.

तसंच, कारगिल खाली उणे 6 तापमान आहे. त्या जागी आशियातील सगळ्यात मोठी टनेल बांधायचं काम सुरू आहे.  2026 पर्यंत पूर्ण होणार पण ते काम 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे.  सुरत-चेन्नई ग्रीन महामार्ग हा दक्षिण आणी उत्तर भारताला जोडणारा आहे' अशी माहितीही गडकरींनी दिली.

अनिल देशमुखांना धक्का, काटोल बाजार समिती निवडणुकीत भाजपने मारली बाजी

रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक अपघात होत आहे, याबद्दल दु: ख वाटतं. पण रस्त्यावर 8 इंचाचे व्हाइट टोपिंग केलं तर खड्डे पडणार नाही. राज्य सरकारनेही हा प्रयोग करावा, असा सल्लाही गडकरींनी दिला.

First published:

Tags: Nashik, Nitin gadkari