मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे

ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे

केवळ वारीत सहभागी झाल्याने धर्म आणि विचारांचा प्रसार होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते वारकरी आहेत, तर आम्ही धारकरी आहोत

केवळ वारीत सहभागी झाल्याने धर्म आणि विचारांचा प्रसार होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते वारकरी आहेत, तर आम्ही धारकरी आहोत

केवळ वारीत सहभागी झाल्याने धर्म आणि विचारांचा प्रसार होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते वारकरी आहेत, तर आम्ही धारकरी आहोत

पुणे, 08, जुलै: शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी, माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगा होतो, असे वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरूजींनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं आहे. 'गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षाही श्रेष्ठ होता,' असं धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सालाबादप्रमाणे पुढील वारीला जाण्यासाठी शेकडो धारकरी संचेती हॉस्पिटलजवळ जमले होते. भिडे गुरूजीही पालखीचे दर्शन घेण्यासाठी तिथे उपस्थित राहिले होते.

हेही वाचा: मुंबई आणि इतर जिल्ह्यातील या 10 ठिकाणी कोसळतोय मुसळधार पाऊस

त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास जंगली मंदिरात त्यांनी सर्व धारकऱ्यांना मार्गदर्शन दिले. यावेळी मुनस्मृतीबद्ल बोलताना भिडे गुरूजी म्हणाले की, ‘वैदिक हिंदू धर्म हा अनुभव सिद्ध असून मनाला जिंकून घेण्याची प्रक्रिया म्हणजे धर्माचार होय. धर्म हा आचरणातून बळकट होतो. त्याला अधिक बळकटी देण्यासाठी संघटनांची गरज असून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यायला हवे,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुढे ते म्हणाले की, ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास आहे. त्या सर्वांनी गावागावात सभा संमेलन घ्यावे. देशाला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा: आता गाड्यांना धक्का मारण्यासाठी घेतले जातायेत पैसे

यावेळी त्यांनी मनुस्मृतीतील काही अध्याय ऐकवले. 'सर्व मानव हे प्राणी आहेत. पण धर्माचरण करणाऱ्या मानवात आणि प्राण्यात फरक आहे. देवाने माणसाला स्वत:ची क्षमता जाणून घेण्याची शक्ती दिली आहे आणि माणूस केवळ धर्मामुळेच स्वत:च्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. पण मनूने या दोन्ही संतांच्या पुढचा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. धर्मच देशाचं रक्षण करू शकतो, हे मनूने दाखवून दिलं आहे,' असं भिडे गुरुजी म्हणाले.

 हेही वाचा: भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

एवढं बोलून ते थांबले नाहीत. पुढे ते म्हणाले की, 'केवळ वारीत सहभागी झाल्याने धर्म आणि विचारांचा प्रसार होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते वारकरी आहेत, तर आम्ही धारकरी आहोत. त्यामुळे दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे. वारकरी आणि धारकरी एकत्र आल्याशिवया काहीही साध्य होणार नाही,' असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्यांचीही त्यांनी टीका केली.

First published:

Tags: Bhide guruji, Manu is greater, Sain tukaram, Sambhaji bhide guruji, Sant dynaneshwar, Shivpratishthan president, भिडे गुरूजी, शिवप्रतिष्ठ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संभाजी भिडे