मुंबई 18 जानेवारी : मुंबईतल्या मंत्रालयाच्या दारातच एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चेंबूरच्या एका महिलेने पेटवून घेण्याचा केला प्रयत्न केला. मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करूनही खासगी सावकाराने लावला तगादा लावल्याचा या महिलेचा आरोप आहे.
स्थानिक पोलीस चौकशी करत नसल्याने या महिलेने मंत्रालयाच्या दारातच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले SRPFचे जवान हवालदार डी. के. माने आणि पोलीस शिपाई के. डी. राऊत यांनी वेळीच महिलेच्या हातातून रॉकेल ची बाटली काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
या आधीही झाला होता आत्महत्येचा प्रयत्न
या आधी ऑगस्ट महिन्यात मंत्रालयाच्या परिसरात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. मंत्रालयाच्या गेटसमोर एका महिलेनं स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव थोडक्यात बचावला. महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलिसांनी तिच्याकडे धाव घेतली आणि तिला तसं करण्यापासून रोखलं. त्यामुळे थोडक्यात या महिलेचा जीव बचावला आहे. या सगळ्या प्रकाराने मंत्रालय परिसर हादरून गेला होता.
राधाबाई साळुंखे अंस या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचं नाव आहे. त्या मुळच्या बीड जिल्ह्याच्या आहेत. राधाबाई यांनी मंत्रालयसमोर स्वतःवर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जमिनीचा निकाल सदर महिलेच्या विरोधात लागला असल्याने राधाबाई यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली होती. मत्रांलय सुरक्षा विभागाने तात्काळ सदर महिलेला ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्हच्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं.