कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी मनोज जयस्वालसह मुलाला अटक

कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी मनोज जयस्वालसह मुलाला अटक

कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती मनोज जस्वाल आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना अंमलबजावणी संचलनाययाने ईडीने अटक केली आहे.

  • Share this:

13 जून : कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती मनोज जयस्वाल आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना अंमलबजावणी संचलनाययाने ईडीने अटक केली आहे.

कोलकात्ताच्या ईडीच्या युनिटनं कोळसा घोटाळ्याच्या तपासासाठी जयस्वाल पितापुत्रांना बोलाणवण्यात आले होते तिथंच त्यांना चौकशी नंतर अटक करण्यात आली. नागपूरच्या अभिजित ग्रुपचे चेअरमन असणाऱ्या मनोज जयस्वाल यांच्या जवळपास ९० कंपन्या आहेत. युपीए - २ च्या काळात झालेल्या कोळसा खाणवाटप घोटाळ्यात ते आरोपी आहेत. या प्रकरणात सीबीआयने एएमआर आयरन एंड स्टील, जेएएस इन्फ्रास्ट्रक्चर आणि जेएलडी यवतमाल पावर या कंपन्यांना कोळसा खाणीचा पट्टा देण्यासंदर्भात आरोपी केले होते.

कोण आहे मनोज जयस्वाल?

- नागपूरच्या अभिजित ग्रुपचे चेअरमन

- मूळचे बिहारचे, भंगाराच्या व्यवसायापासून सुरुवात

- नंतर रेल्वे स्लीपरचा व्यवसाय

- यूपीए २च्या काळात अनेकांना खाणी मिळवून दिल्या

- अभिजित ग्रुपच्या जवळपास ९० कंपन्या

- गुन्हेगारी कट रचून कोळसा खाण  वाटप केल्याचा आरोप

- विविध बँकांचे एकूण १२ हजार कोटी थकित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2017 06:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading