मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या मनोहर भोसलेचा पर्दाफाश, बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल

बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या मनोहर भोसलेचा पर्दाफाश, बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल

 पीडित महिला ही आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामाच्या आश्रमात आली होती.

पीडित महिला ही आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामाच्या आश्रमात आली होती.

पीडित महिला ही आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामाच्या आश्रमात आली होती.

 सोलापूर, 10 सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले (Manohar Mama Bhosale)  याचा पर्दाफाश झाला आहे. कारण, एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार (rape case) करत तिच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित महाराज मनोहर भोसले याच्यासह त्याचे साथीदार नाथ बाबा उर्फ विशाल वाघमारे आणि वैभव वाघ या तिघांवर भादवि कलम 376, 385,506 तसेच जादुटोणा विरोधी प्रतिबंधक कायदा 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केल्यानंतर तो करमाळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

भयंकर ! अमेरिकेतील शाळांमध्ये कोरोनाचा कहर, साडेसात लाख मुलांना लागण

दरम्यान आरोपी मनोहर मामा हा फरार झालेला असून त्याच्या शोधासाठी तीन पथकं रवाना झाली आहे. पीडित महिला ही आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामाच्या आश्रमात आली होती. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिघांनी तिची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केला.

त्याचबरोबर तिच्याकडून पैसे देखील उकळण्यात आल्याचे पीडितेनं आपल्या फिर्यादीत सांगितलं आहे. त्यामुळे आता कथित मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले केव्हा सापडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बारामतीतही गुन्हे दाखल

दरम्यान, गुरुवारीच  मनोहर मामा भोसले याच्यासह त्याच्या दोन अन्य सहकाऱ्यांच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत त्यांनी फसवणूक केली. याप्रकरणी तिघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा आणि उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, 6 जणांचा मृत्यू तर 16 जनावरांसह 900 कोंबड्या दगावल्या

विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओकांर शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. बारामतीमधील शशिकांत सुभाष खरात या 23 वर्षीय तरुणाने याबाबत तक्रार दिली आहे. 20 ऑगस्ट 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या आणि फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे.

First published:
top videos