डॉक्टरांची मान शरमेनं झुकली, मनमाडमध्ये संतापजनक घटना

डॉक्टरांची मान शरमेनं झुकली, मनमाडमध्ये संतापजनक घटना

मनमाडमध्ये डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

  • Share this:

मनमाड, 25 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जीवघेण्या या व्हायरसशी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून आपलं कर्तृत्व बजावत आहे. परंतु, मनमाडमध्ये डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे.  उपचारासाठी आलेल्या महिलेशी एका डॉक्टराने अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटना येवल्यात घडली आहे.

महेश जोशी असं या डॉक्टराचं नाव आहे. महेश जोशी याने आपल्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आलेल्या विवाहित महिलेसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.  या घटनेमुळे येवला शहरात खळबळ उडाली आहे.

घडलेला प्रकार पीडित महिलेनं घरी सांगितल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी दवाखान्यात जाऊन या डॉक्टराला चांगलाच बेदम चोप दिला. ही मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

नातेवाईकांनी या डॉक्टरला क्लिनिकमधून बाहेर काढले आणि भररस्त्यावर चांगलीच धुलाई केली. कपडे फाटेपर्यंत या डॉक्टराला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

हेही वाचा -लहान मुलांनीच केला आई खूनी असल्याचा खुलासा, 'आधी पप्पांना खुर्चीवर बांधलं आणि...

या प्रकरणी तक्रार दाखल्यानंतर पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या डॉक्टर महेश जोशीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात विनयभंग आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन -सचिन साळवे

First published: May 25, 2020, 2:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading