लहान मुलांची काळजी घ्या, कोरोनाबद्दल मनमाडमधून आली धक्कादायक बातमी!

लहान मुलांची काळजी घ्या, कोरोनाबद्दल मनमाडमधून आली धक्कादायक बातमी!

चार दिवसांपूर्वी ज्यांनी स्वॅब दिला होता त्यांचा सोमवारी अहवाल आला असून त्यात 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष वय असलेल्या तीन बालकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची आरोग्य विभागाकडून माहिती मिळाली.

  • Share this:

मनमाड, 14 एप्रिल : वयोवृद्ध,तरुणांपाठोपाठ मनमाड (Manmad) शहरात आता लहान बालके देखील कोरोनाच्या (Corona) विळख्यात सापडू लागली असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.  सोमवारी आलेल्या अहवालात 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष वय असलेल्या तीन बालकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Report Positive) आल्याचे कळताच शहरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये तर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाची दुसरी लाट केवळ राज्यातच नव्हे तर देशात थैमान घालत आहे. मनमाड शहर देखील त्याला अपवाद नाही येथे ही रोज मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. रुग्णांनी शहरातील सर्वच खाजगी हॉस्पिटल दवाखाने फुल भरलेले असून खाजगी लॅब व शासकीय कोविड सेंटरवर स्वॅब देण्यासाठी रोज मोठ्या मोठ्या रांगा लागत आहे.

कोरोनाविरोधातील लढ्याबाबत मोठी बातमी; कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार

चार दिवसांपूर्वी ज्यांनी स्वॅब दिला होता त्यांचा सोमवारी अहवाल आला असून त्यात 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष वय असलेल्या तीन बालकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची आरोग्य विभागाकडून माहिती मिळाली. या अगोदर वयोवृद्ध, तरुणांना कोरोनाची लागण होत होती. मात्र आता लहान मुलं देखील कोरोनाच्या विळख्यात सापडू लागल्यामुळे हे अत्यंत चिंताजनक असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे कोरोना आता दारापर्यंत नव्हे तर आपल्या लहान मुलापर्यंत येवून पोहोचाल असताना दुसरीकडे मात्र अद्यापही अनेक नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. आज ही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेक नागरिक मास्क घालत नाही. काही महाभाग तर असे ही आहे की स्वॅब दिल्यानंतर ते खुशाल बाजारात फिरताना दिसतात. त्यांच्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत असल्यामुळेच शहरात रुग्णाची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तरच आपण कोरोनाला हरवू शकतो अन्यथा सुरू झालेले मृत्यूतांडव पुढे ही असेच सुरु राहील असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

Published by: sachin Salve
First published: April 14, 2021, 8:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या