मतदान करून परत जाताना दुचाकीचा अपघात, 3 शेतमजुरांचा जागीच मृत्यू

दुचाकीस्वाराचं नियंत्रण सुटल्यानं दिंडोरी-कोशिंबे मार्गावर दुर्घटना.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 07:11 AM IST

मतदान करून परत जाताना दुचाकीचा अपघात, 3 शेतमजुरांचा जागीच मृत्यू

बब्बू शेख, (प्रतिनिधी) मनमाड

दिंडोरी, 22 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडलं. मतदान करुन कामासाठी जात असताना दिंडोरी-कोशिंबे मार्गावर दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होऊन तीन शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी खड्ड्यात गेल्यानं हा अपघात झाला. या अपघातात यादव जाधव, रामदास पवार आणि भोलेनाथ कडाळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तीनही शेतमजूर असून दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे कामाला होते मतदान करण्यासाठी तिघे त्यांच्या मूळगावी सुरगाणा तालुक्यातील दुमीपाडा येथे आले होते. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पुन्हा कामाला जाणार होते. मतदान केल्यानंतर परत जात असतांना हा अपघात झाला आणि त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे शेतमजुरांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

वारंवरा खड्ड्यांमुळे होणारे अपघात हे वाढताना दिसत आहेत. आंदोलनं करून प्रस्ताव देऊनही खड्डे बुजवण्याबाबत प्रशासनाकडून ढिसाळ कारभार होत असल्याचं दिसत आहे. येणारं आगामी सरकार तरी खड्डे बुजवणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 मुंबईकरांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी खासगी बस उटलून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे.कामशेत बोगदापासून काही अंतरावर सोमवारी (21 ऑक्टोबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसनं सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघातावेळी बसमध्ये एकूण 35 प्रवासी होती. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सयाजी पाटील, संभाजी पाटील आणि मोहन नलावडे अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी मुंबई घनसोली येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात होते.

Loading...

EXIT POLL मध्ये कोण ठरलं पैलवान? पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 07:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...