मोपलवारांना 7 कोटींसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक

मोपलवारांना 7 कोटींसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक

अनेक मोठ्या हस्तींचा या प्रकरणी सहभाग असल्याचं सांगितलं जातंय.

  • Share this:

ठाणे,03 नोव्हॆंबर: राधेश्याम मोपलवारांना ब्लॅकमेल करणाऱ्या सतीश आणि श्रद्धा मांगलेंना अटक करण्यात आली आहे. 7 कोटीच्या खंडणी प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून 6 पोते कागदपत्र आणि अनेक ऑडिओ, व्हीडिओ सीडीही जप्त करण्यात आल्या आहेत. सतीश मांगले या प्रकरणाचा सूत्रधार आहे. अनेक मोठ्या हस्तींचा या प्रकरणी सहभाग असल्याचं सांगितलं जातंय. पैसे घेऊन परदेशात पळण्याचा सूत्रधार प्रयत्न करत होता.सतीश मांगले आणि त्याची पत्नी श्रद्धा मांगले यांना अटक झाली असली तरी याप्रकरणी दोन आरोपी फरार आहेत. हे दोघंही श्रीलंकेला पळून जात होते. हे पळून जात असताना त्यांना ताब्यात घेतलं आहे. सतीश मांगले आणी त्याची पत्नी श्रद्धा मांगले यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीलंकेला पळून जाताना या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

First published: November 3, 2017, 2:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading